आतल्या वेदनांची जखम, नैराश्याने घात, ‘छावा’ संघटनेचा तालुकाध्यक्ष, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षापुढे हार, टोकाचं पाऊल
फेसबुकवर वैयक्तिक आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण तालुक्यातील युवक तालुका अध्यक्षाने एसटी बससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
औरंगाबाद : कोरोना संकट काळ सध्या प्रचंड घातक आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांच्या उद्योगधंद्यांवर परिणाम पडला. त्यामुळे अनेक तरुण, व्यापारी, उद्योगपती नैराश्यात गेले. काही जणांनी नैराश्यात जावून आत्महत्या केल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. औरंगाबादेमध्ये देखील अशीच काहिशी घटना समोर आली आहे. औरंगाबादेत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
महेश फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला?
फेसबुकवर वैयक्तिक आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण तालुक्यातील युवक तालुका अध्यक्षाने एसटी बससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना ही काल (17 ऑगस्ट) रात्री नेवासा-नगर महामार्गावरील वाघाडी गावाजवळ घडली. या घटनेमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महेश पाटील शिंदे असे आत्महत्या करणाऱ्या ‘छावा’च्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
महेश अनेक दिवसांपासून तणावात
गेल्या काही दिवसांपासून महेश हा तणावात होता. मात्र कोणत्या कारणाने तो तणावात होता, हे त्याने कुणालाही सांगितले नाही. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याने फेसबुकवर आयुष्यात खूप त्रास आहे. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नका, अशी पोस्ट टाकली. त्यानंतर काही वेळातच त्याने अहमदनगर-नेवासा मार्गावरील वाघाडी गावाजवळ दुचाकी बाजूला उभी करुन भरधाव जाणाऱ्या एसटी बससमोर उडी घेत आत्महत्या केली.
जखमी महेशला नागरिकांनी रुग्णालयात नेलं, पण…
महेश अचानक बसखाली आल्याने बस चालकही काही करु शकला नाही. महेश या घटनेत प्रचंड जखमी झाला. त्याला परिसरातील नागरिकांनी तातडीने नेवासा येथील रुग्णालयात दाखल केलं. पण तो गंभीर जखमी झाला होता. याशिवाय अतिरक्तस्त्रावामुळे महेशची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशला मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी पैठण जवळील त्याच्या मूळ गावी त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आली.
हेही वाचा :
आधी इन्स्टाग्रामवर ओळख, मग शारीरिक संबंध; हनी ट्रॅप करून व्यावसायिकाला लुटणारी टोळी पुण्यात जेरबंद
‘सिंघम’ पोलीस लाथ मारुन घरात शिरला, औरंगाबादेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाचवलं