Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटच्या दोन मुलांना बिल्डिंगच्या 15 व्या मजल्यावरुन फेकलं, सैतान बापासह प्रेयसीला फाशी

प्रेयसीला त्याच्या आधीच्या बायकोपासून झालेली दोन मुलं सांभाळण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे तिने दोन्ही मुलांपासून स्वतःला दूर ठेवण्यास सांगितलं होतं. मात्र बापातील सैतान जागा झाला आणि त्याने पोटच्या दोन्ही पोरांचा जीवच घेतला.

पोटच्या दोन मुलांना बिल्डिंगच्या 15 व्या मजल्यावरुन फेकलं, सैतान बापासह प्रेयसीला फाशी
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 9:51 AM

बीजिंग : पोटच्या दोन मुलांची इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन फेकून हत्या केल्याप्रकरणी बाप आणि त्याच्या प्रेयसीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रेयसीच्या सांगण्यावरुन बापाने दोघा मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. प्रियकराच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांची काळजी घेण्याची इच्छा नसल्यामुळे प्रेयसीने तशी गळ घातली होती. चीनमध्ये ही घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

‘डेली मेल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला चीनच्या चोंगकिंग नगरपालिकेतील टॉवर ब्लॉकमधून दोन लहान मुले पडल्याची बातमी समोर आली होती. दोन वर्षांची झांग रुईशू आणि एक वर्षांचा झांग यांगरुई अशी या दोन मुलांची नावं होती. रुईशूचा इमारतीतून पडून जागीच मृत्यू झाला. तर यांगरुईने काही काळानंतर डोळे मिटले. ही दोन्ही मुलं झांग बो नावाच्या 27 वर्षीय व्यक्तीची असल्याचे पोलिसांना समजले.

मुलांपासून दूर होण्यास प्रेयसीचा तगादा

पोलिसांनी सांगितले की झांग बो याचा पत्नीशी घटस्फोट झाला होता आणि त्याला त्याची प्रेयसी ये चेंगशेनशी लग्न करायचे होते. मात्र तिने दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिला. ती त्याला बराच काळ त्या मुलांपासून वेगळे राहण्यास सांगत होती. तिने झांग बो याला असेही सांगितले की जोपर्यंत तो मुलांपासून वेगळा होत नाही, तोपर्यंत ती त्याच्याशी लग्न करणार नाही.

मुलाचा ताबा वडिलांकडे

झांग बो याची घटस्फोटित पत्नी चेन मेलिनने सांगितले की, लग्न झाल्यानंतरही झांगचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. त्यामुळे त्याने घटस्फोट दिला. नुकतेच न्यायालयाने मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्याचा आदेश दिला होता. तर मुलगा 6 वर्षांचा होईपर्यंत त्याचा ताबा त्याच्या वडिलांना असेल, असे कोर्टाने सांगितले होते.

प्रेयसीचं टोकाचं पाऊल

हा प्रकार झांगच्या प्रेयसीला समजताच तिने त्याला मुलांपासून वेगळे होण्यास सांगितले. एके दिवशी दोन्ही मुलं झांगसोबत असताना प्रेयसीला इतका राग आला, की तिने लाईव्ह व्हिडिओ कॉलवर आपल्या मनगटाची नस कापली. यामुळे झांग प्रचंड अस्वस्थ झाला आणि त्याने भावनेच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना इमारतीतून खाली फेकून दिले.

पोलिसांसमोर बनाव

पोलिसांनी सांगितले की झांगने सुरुवातीला खोटे सांगितले की त्याची मुले इमारतीतून खाली पडली, तेव्हा तो झोपला होता. नंतर त्याने पोलिसांसमोर रडण्याचे नाटकही केले. पण पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सर्व काही कबूल केले. 28 डिसेंबर रोजी न्यायालयाने झांग बो आणि त्याची मैत्रीण ये चेंगशेन यांना फाशीची शिक्षा सुनावली.

संबंधित बातम्या :

भंडाऱ्यातून पळून नागपुरात आले, संसार थाटला; पण, दारूचे व्यसन लागले अन् प्रेमविवाह भंगला!

पाचवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; महिन्यातील दुसरी घटना, नेमके कारण काय?

उपचारादरम्यान पत्नीने प्राण सोडले, संतप्त पतीचा डॉक्टरवर गोळीबार

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.