AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस कर्मचाऱ्याची कमाल, लाचसुद्धा घेतली ऑनलाईन, ‘फोन पे’ वर पैसे पाठवले मग…

Crime News: बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी वाहतुकीसाठी एका 30 वर्षीय ठेकेदाराकडून लाच मागण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक विभागाचा सहायक फौजदार अशोक वाघ याने ही लाच मागितली. ठेकेदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली.

पोलीस कर्मचाऱ्याची कमाल, लाचसुद्धा घेतली ऑनलाईन, 'फोन पे' वर पैसे पाठवले मग...
ACBImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 11, 2025 | 11:34 AM
Share

Crime News: सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. आता खिशात पैसे ठेवण्याऐवजी कुठेही ऑनलाईन पैसे ट्रन्सफर करण्यात येतात. मात्र, लाच कधी ऑनलाईन घेतली जाईल का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळणार आहे. परंतु पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन लाच घेण्याचा प्रताप केला आहे. शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तो अडकला. छत्रपती संभाजीनगरमधील सहायक फौजदारास अटक करण्यात आली आहे.

बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी वाहतुकीसाठी एका 30 वर्षीय ठेकेदाराकडून लाच मागण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक विभागाचा सहायक फौजदार अशोक वाघ याने ही लाच मागितली. ठेकेदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर संभाजीनगरमधील हर्सुल टी पॉइंटवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अशोक वाघ यांना अटक केली. अशोक वाघ याने एक हजारांची लाच मागून चक्क ती ‘फोन-पे’ने स्वीकारली. सेवानिवृत्तीस अवघे दीड वर्ष असताना त्यांनी ऑनलाईन लाच घेण्याचे  धाडस केले.

30 वर्षीय तक्रारदाराचा बांधकामासाठी खडी, कच, वाळू पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे वडील स्वतः ट्रॅक्टरद्वारे या साहित्याचा पुरवठा करतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून सातत्याने अडवणूक करून पैशांची मागणी केली जात होती. त्याला कंटाळून त्या तरुणाने तक्रार केली.

एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे ठेकेदाराने तक्रार केली. आटोळे यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी तक्रारीची खातरजमा केली. तेव्हा वाघ याने तक्रारदाराला शनिवारी सायंकाळी हसूल परिसरात पैसे घेऊन बोलावले. निरीक्षक अमोल धस यांनी अंमलदार युवराज हिवाळे, राजेंद्र नंदीले, चांगदेव बागुल यांच्यासह तेथेच सापळा रचला. तक्रारदाराने वाघची भेट घेतली. तेव्हा त्याने तत्काळ ‘फोन पे’ वरच ऑनलाइन एक हजार रुपये पाठवण्यास सांगितले. लाच स्वीकारताच धस यांनी धाव घेत वाघ याला ताब्यात घेत मोबाइल जप्त केला. त्याला अटक करून हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.