Malegaon riots| मालेगाव दंगलीतील संशयित आरोपी शरण, पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीसह पोलिसांवर आरोपांच्या फैरी

मालेगाव दंगलीतील 16 जण फरार आहेत. संशयित आरोपी शरण घेण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत आहे, याचा साधा सुगावाही गाफिल पोलीस यंत्रणेला नव्हता. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Malegaon riots| मालेगाव दंगलीतील संशयित आरोपी शरण, पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीसह पोलिसांवर आरोपांच्या फैरी
मालेगाव दंगलीतील संशयित नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी याने पत्रकार परिषद घेतली.
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 11:04 AM

नाशिकः मालेगाव दंगलीतील संशयित आरोपी नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्यापूर्वी त्याने एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. पक्षाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शहराला टार्गेट केले, असा आरोप त्याने केला. विशेष म्हणजे अजूनही या दंगलीतील 16 जण फरार आहेत. संशयित आरोपी शरण घेण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत आहे, याचा साधा सुगावाही गाफिल पोलीस यंत्रणेला नव्हता. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमके प्रकरण काय?

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये नोव्हेंबर महिन्यात दंगली उसळल्या. त्यात मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, इतर 42 जणांवर कारवाई केली आहे. दंगलीच्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

कोट्यवधींचा भ्रष्टाचार

डिग्निटी घटनेनंतर महिनाभर फरार होता. त्यानंतर त्याची पत्नी आणि मालेगाव महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद यांनी अचानक त्यांच्या घरी एक पत्रकार परिषद बोलावली. यावेळी डिग्निटी समोर आला. त्याने मालेगावातली दंगल एक पूर्वनियोजित कट होता, असा आरोप केला. महापालिकेतील भ्रष्ट कामांची कोट्यवधींची बिले तक्रार केल्यामुळे अडकली आहेत. त्यामुळे या हिंसाचारात आपल्यावर हल्ला करण्याचा कट होता, असा आरोप त्याने केला. याप्रकरणी एमआयएम, जनता दल यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. त्यांचा फिर्यादीत कसा काय उल्लेख नाही, असा सवाल त्याने केला.

पोलिसांवर दबाव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नावे येऊ नयेत म्हणून पोलिसांवर दबाव होता. स्वातंत्र्यानंतर भारतात राहिलेले मुस्लीम हे जिना नव्हे तर गांधी आणि आंबेडकरांना नेते मानतात. आम्हीही त्यांनाच नेते मानतो. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास असून, यातून मी सहज सुटेन, असा दावा त्याने केला. या पत्रकार परिषदेनंतर दुचाकीसह शहरातून पोलिस ठाण्यात हजर राहून त्याने शरणागती पत्करली. डिग्निटी हा दिवंगत माजी मंत्री निहार अहमद यांचा जावई आहे. आता या आरोपामुळे पुन्हा एकदा मालेगाव दंगलीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

इतर बातम्याः

Shiv Sena| शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही, मिनी UPA चा प्रयोग सुरू; संजय राऊत यांचे वक्तव्य

Mumbai Bank Election| आपण मजूर आहात का? सहकार विभागाची दरेकरांना नोटीस

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.