Egypt Crime : पैशासाठी आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकणाऱ्या प्रेमी युगुलाला तुरुंगवासाची शिक्षा

नॅन्सीने हा व्हिडिओ मोका हिजाझी या नावाने अपलोड केला होता. हा व्हिडिओ अनैतिक असल्याचे इजिप्शियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर नॅन्सी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली. पैसे कमावण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने शूट केला आणि नंतर व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप मुलीने प्रियकरावर केला आहे.

Egypt Crime : पैशासाठी आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकणाऱ्या प्रेमी युगुलाला तुरुंगवासाची शिक्षा
पैशासाठी आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकणाऱ्या प्रेमी युगुलाला तुरुंगवासाची शिक्षाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 11:16 PM

आक्षेपार्ह व्हिडिओ (Offensive video) बनवल्याप्रकरणी 16 वर्षीय मुलीला इजिप्तच्या न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तर तिचा हा व्हिडिओ शूट करणाऱ्या तिच्या प्रियकराला 3 वर्षांचा तुरुंगवास (Imprisonment) आणि 4 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मुलीचा डान्स व्हिडिओ अश्लील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नॅन्सी अल-सयद (Nancy Al-Sayed) असे या मुलीचे नाव आहे. तर मोआझ एम (Moaz M) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. नॅन्सी अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉवर तिचे व्हिडिओ अपलोड करत असते. मात्र अलीकडेच तिच्या एका व्हिडिओवरून गदारोळ झाला होता. टिकटॉकर नॅन्सीला गिझा येथील बाल न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. (Couple sentenced to imprison for making Offensive videos for money)

प्रियकराने बळजबरीने व्हिडिओ शूट केल्याचा आरोप

नॅन्सीने हा व्हिडिओ मोका हिजाझी या नावाने अपलोड केला होता. हा व्हिडिओ अनैतिक असल्याचे इजिप्शियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर नॅन्सी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली. पैसे कमावण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने शूट केला आणि नंतर व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप मुलीने प्रियकरावर केला आहे. नॅन्सी आणि तिच्या प्रियकरावर अश्लील व्हिडिओ पोस्ट करणे, तसेच समाजातील मूल्ये आणि तत्त्वांचे उल्लंघन करणे, समाजाच्या खासगी जीवनाचे पावित्र्य भंग करणे आदी आरोप लावण्यात आले आहेत.

पैशांसाठी बनवला अश्लील व्हिडिओ

नॅन्सीच्या आई-वडिल 10 वर्षांपासून वेगळे राहत असून नॅन्सीही गेल्या वर्षभरापासून एकटीच राहते. इंटरनेटवर अनेक मुली व्हिडिओ आणि फोटो बनवून इंटरनेटवर टाकतात आणि यातून खूप पैसे कमवतात. त्यामुळे आपणही पैसे कमावण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे नॅन्सीने पोलिसांना सांगितले. (Couple sentenced to imprison for making Offensive videos for money)

इतर बातम्या

Yavatmal Bee Attack : यवतमाळमध्ये मधमाशांच्या हल्यात उपसरपंचाचा मृत्यू; येडशी येथील धक्कादायक घटना

Chandrapur Crime : चोरांनी चक्क सुरक्षा रक्षकाची बंदूकच पळवली, बँक ऑफ इंडियाची शाखाही फोडली

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.