शंभरहून अधिक महिलांना आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवले, 22 वर्षीय जिम ट्रेनरला अटक
आरोपी विकासने महिलांशी संपर्क साधण्यासाठी महिलांच्या नावानेच फेक फेसबुक अकाऊण्ट उघडली होती. तीन अकाऊण्टमध्ये दोन हजारांहून अधिक महिला फ्रेण्ड लिस्टमध्ये होत्या.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर शंभरहून अधिक महिलांचा छळ केल्याप्रकरणी जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. फेसबुकसह अन्य समाज माध्यमांतून नजर ठेवत (स्टॉकिंग) त्रास दिल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडीओ पाठवून जिम ट्रेनर विकास कुमार महिलांचा छळ करत असल्याचा आरोप आहे. (Gym trainer arrested for stalking harassing sending obscene videos on social media to 100 women online in Delhi)
महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हे उघड
सायबर स्टॉकिंग प्रकरणी दिल्लीतील महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शनिवारी विकासला अटक केली. वारंवार बजावूनही ऑनलाईन स्टॉकिंग आणि आक्षेपार्ह मेसेज करुन विकास त्रास देत असल्याची तक्रार पीडितेने केली होती. आपल्याला तुझे वैयक्तिक तपशील माहित असल्याचं सांगून आरोपीने तक्रारदार महिलेला धमकावल्याचाही दावा केला जात आहे.
दिल्लीच्या सायबर टीमने फेसबुकशी संपर्क साधून आरोपीचा तपशील मिळवला होता. महिलांना लक्ष्य करण्यासाठी आरोपीने फेक आयडी उघडले होते. त्यावर त्याने दिलेले सर्व डिटेल्स चुकीचे होते, अशी माहिती दक्षिण पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी दिली.
आरोपीला राहत्या घरातून अटक
“संबंधित फेसबुक अकाऊण्टशी लिंक केलेल्या फोन नंबरवर आम्ही संपर्क साधला. तो नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न आम्ही केला, तेव्हा तो अन्य व्यक्तीचा असल्याचं समजलं. आरोपी हा तक्रारदार महिलेच्या घराजवळच राहत असल्याचं आम्हाला समजलं” असंही गोयल यांनी सांगितलं. त्यानंतर आरोपी विकास कुमारला राहत्या घरातून अटक करण्यात आली.
महिलांच्या नावानेच फेक फेसबुक अकाऊण्ट
आरोपी विकासने महिलांशी संपर्क साधण्यासाठी महिलांच्या नावानेच फेक फेसबुक अकाऊण्ट उघडली होती. तीन अकाऊण्टमध्ये दोन हजारांहून अधिक महिला फ्रेण्ड लिस्टमध्ये होत्या. त्यापैकी शंभरहून अधिक महिलांवर तो पाळत ठेवत होता. याशिवाय महिलांना व्हिडीओ कॉल करुन त्या माध्यमातून तो हस्तमैथुन करत असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं.
संबंधित बातम्या :
न्यूड चॅटचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, तरुणांना फसवणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांना अटक
तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप
(Gym trainer arrested for stalking harassing sending obscene videos on social media to 100 women online in Delhi)