जगावेगळे ठकसेन ! कुणी फ्लॅट घेतला, तर कुणी शोरूम, चोऱ्या करायला विमानाने जायचे; फक्त दोन ट्रिकमुळे हजारो कमावले

राजस्थान पोलिसांनी ठकसेनांची एक टोळी पकडली आहे. हे ठकसेन अनोख्या पद्धतीने चोरी करायचे. त्यांचे कारनामे ऐकून पोलीसही चक्रावले. तुम्हीही ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल. इतक्या सफाईदारपणे ते चोरी करायचे.

जगावेगळे ठकसेन ! कुणी फ्लॅट घेतला, तर कुणी शोरूम, चोऱ्या करायला विमानाने जायचे; फक्त दोन ट्रिकमुळे हजारो कमावले
Bank ATM RobberyImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 11:07 PM

जयपूर | 11 सप्टेंबर 2023 : तुम्ही अनेक चोर आतापर्यंत पाहिले असतील. श्रीमंतांना लुटून गरीबांना पैसे देणारे, गरीबांच्या मदतीला धावून जाणारे असे अनेक ठकसेन आपण पाहिले असतील. पण विमानातून जाऊन लोकांना ठकसेन कधी पाहिलेत का? राजस्थानात या ठकसेनांची एकच टोळीच सक्रिय आहे. पोलिसांनी जेव्हा ही टोळी पकडली, तेव्हा जी माहिती मिळाली त्याने पोलीस चक्रावूनच गेले. ज्यांचे खाण्याचे वांदे होते अशा या ठकसेनांची संपत्ती पाहून पोलिसांचा विश्वासच बसेना. नेमकं काय प्रकरण आहे हे तेच जाणून घ्या.

मेवात गँगच्या ठकसेनांची ही टोळी आहे. या गँगच्या ठकसेनांवर आधी लाखो रुपयांचे कर्ज होते. कुणाचे खाण्याचे वांदे होते. मात्र, या गँगमध्ये सामील झाल्यापासून ते मालामाल झाले. काहींना कार घेतली. काहींना फ्लॅट तर काहींनी शोरूम उघडला. तर काहींनी आपल्या अंगावरील लाखो रुपयांचं कर्ज काही दिवसातच फेडलं. सर्व काही ठकवलेल्या पैशातून केलं. आणि हा पैसा बँकांना फसवून मिळवलेला होता.

कमिशनही द्यायचे

हे ठकसेन राजस्थानच्या बाहेर विमानाने जायचे. ग्रामीण भागातील एटीएममधून पैसा काढायचे आणि महागड्या हॉटेलात राहून मौजमजा करायचे. धक्कादायक बाब म्हणजे हे लोक ओळखीच्या लोकांकडून भाड्याने एटीएम कार्ड घ्यायचे. त्या एटीएम कार्डद्वारे पैसा काढायचे आणि कमिशन म्हणून ओळखीच्या लोकांना 50 टक्के रक्कमही द्यायचे. त्यामुळे या ठकसेनांवर कुणाचाच संशय राहत नव्हता.

संदिग्ध हालचालीमुळे पकडले

जयपूर आंतरराष्ट्रीय विमातळावर हे ठकसेन हैदराबादच्या फ्लाईटने येणार असल्याची आम्हाला खबर मिळाली. त्यानंतर सीआयडी, डीएसटी आणि विमानतळ पोलिसांनी विमानतळावर दबा धरला. आणि पाच ठकसेनांना अटक केली. विशेष म्हणजे या ठकसेनांची लाइफस्टाईल पाहून पोलीसही थक्क झाले. त्यांना अटक करावी की नाही असा प्रश्न पोलिसांना पडला. पण त्यांच्या संदिग्ध हालचालीमुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती डीसीपी ज्ञानचंद यादव यांनी दिली.

महाराष्ट्र आणि तेलंगणात लुटमार

पोलिसांनी जुबेर खान, लुकमान दीन, सद्दाम खान, इलियास आणि मुस्ताक मोहम्मद यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 एटीएम कार्ड आणि 2.31 लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. हे सर्व आरोपी भरतपूर जिल्ह्यातील डीग येथील राहणारे आहे. सायबर ठकसेनांसोबत ते कमिशनवर काम करत होते.

त्यांना एटीएममधून पैसा काढण्याचा टास्क मिळायचा. त्यानंतर ते महाराष्ट्र आणि तेलंगना सारख्या राज्यात फ्लाईटने जाऊन पैसे काढायचे. त्यांनी आतापर्यंत किती लुटमार केली याचा आकडाही त्यांना माहीत नाही. त्यांनी अनेक नॅशनल बँकांना कोट्यवधी रुपयाचा चुना लावला आहे.

अशी करायचे चोरी

हे ठकसेन आधी लोकांशी संपर्क करायचे. त्यानंतर त्यांचं एटीएम पिननंबरसहीत भाड्याने घ्यायचे. त्यानंतर तिकीट बूक करून जयपूर विमानतळावरून फ्लाईटने इतर राज्यात जायचे. दुसऱ्या राज्यातील ग्रामीण भागात ते जायचे. ज्या ठिकाणी एटीएममध्ये लाईट आणि सीसीटीव्हीची सुविधा नसेल अशा ठिकाणी जायचे. त्यानंतर त्या एटीएममधून पैसा काढायचे.

त्यानंतर ते ज्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतलं त्यांना फोन करायचे. इतर राज्यातून आमच्या एटीएममधून पैसे काढले पण मध्येच अडकल्याची तक्रार बँकेत करायला सांगायचे. त्यानंतर नियमानुसार तक्रारीनंतर एक आठवड्यानंतर ती रक्कम पुन्हा खात्यात येताच हे ठकसेन ती रक्कम खात्यातून काढून घ्यायचे.

दोन लोक करायचे कारनामा

या कामात दोन लोक सामील व्हायचे. एकजण एटीएमच्या बाहेर असायचा. तर दुसरा आत असायचा. एकजण एटीएमच्या बाहेर पॉवर सप्लाय करणाऱ्या स्विचवर हात ठेवायचा. तर दुसरा कॅश विथ ड्रॉ करायचा. जेव्हा कॅश एटीएममधून बाहेर यायची तेव्हा बाहेर उभा असलेला व्यक्ती लगेच स्विच बंद करायचा. त्यामुळे एटीएममधून पैसेही निघायचे आणि खात्यातून पैसेही कापले जायचे नाहीत.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....