Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आक्षेपार्ह फोटोंवरुन तरुणाचे ब्लॅकमेलिंग, अकरावीतील विद्यार्थिनीचा गळफास

संबंधित अल्पवयीन तरुणी भालुवणी येथील कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होती. तिच्या वर्गात दुसऱ्या गावातील एक विद्यार्थीही शिक्षण घेत होता. तो पीडित तरुणीचा बराच काळापासून पाठलाग करत होता. आरोपीने विद्यार्थिनीशी मैत्री केली. तिच्याशी गोड बोलून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले

आक्षेपार्ह फोटोंवरुन तरुणाचे ब्लॅकमेलिंग, अकरावीतील विद्यार्थिनीचा गळफास
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 2:16 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील देवरिया येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला लाडी-गोडी लावून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढली होती. त्यानंतर तो तरुणीला ब्लॅकमेलिंग करत होता. अखेर तरुणाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने जाचाला कंटाळून 24 ऑक्टोबर रोजी गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

देवरिया येथील खुखुंडू परिसरातील एका गावात राहणारी संबंधित अल्पवयीन तरुणी भालुवणी येथील कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होती. तिच्या वर्गात दुसऱ्या गावातील एक विद्यार्थीही शिक्षण घेत होता. तो पीडित तरुणीचा बराच काळापासून पाठलाग करत होता. आरोपीने विद्यार्थिनीशी मैत्री केली. तिच्याशी गोड बोलून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर तो सतत तिला त्रास देत असे.

वडिलांना पाहून तरुणाचा भडका

तरुणाच्या ब्लॅकमेलिंगमुळे विद्यार्थिनी सातत्याने तणावाखाली राहत होती. 22 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. ही बाब मुलीच्या वडिलांच्या कानावर गेली. त्यानुसार वडील आपल्या मुलीसोबत ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. हे पाहून मुलगा संतापला आणि शिवीगाळ करु लागला. हे पाहून गर्दी जमा झाली.

विद्यार्थिनीचा फोटो सोशल मीडियावर शेअर

पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र मुलगा तिथून पळून जाण्यात. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रारही केली. 23 ऑक्टोबरला रागाच्या भरात मुलाने विद्यार्थिनीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर 24 ऑक्टोबरला सकाळी मुलीने किचनमध्ये टीन शेडला गळफास लावून घेतला.

संबंधित बातम्या :

चौथ्या मजल्यावरुन उडी घेत विवाहितेची आत्महत्या, आई म्हणते, तिच्या दीर-नवऱ्याकडून हत्या

चायनिजच्या गाडीवर गल्ल्यावरुन राडा, पाच जणांची बेदम मारहाण, भिवंडीत तरुणाचा मृत्यू

पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला, रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत झोपली, अंगावर काटा आणणारा हत्येचा घटनाक्रम

खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....