Crime : पती, पत्नी और वो! त्याला घरात पाहून संशय वाढला, पारा चढताच पत्नीचा काटा काढला

अनिल काही कामानिमित्त घराच्या बाहेर गेला होता. तेंव्हा रश्मी एकटीच घरी होती. मात्र, अनिलने घरी परल्यानंतर पाहिले की, बबलू आणि आपली पत्नीसोबत एकटेच घरात आहेत. यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. अनिलने पत्नी रश्मीचा गळा आवळून खून केला आणि नंतर दरवाजा बाहेरून बंद करून घटनास्थळावरून पळ काढला.

Crime : पती, पत्नी और वो! त्याला घरात पाहून संशय वाढला, पारा चढताच पत्नीचा काटा काढला
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 4:54 PM

दिल्लीतील (Delhi) रोहिणी भागात एका व्यक्तीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केलीयं. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या घटनेची माहिती मृत महिलेच्या मेहुण्याने पोलिसांना (Police) दिली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी (Accused) फरार झाला असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वी अनिलचा ओरिसातील रश्मीसोबत प्रेमविवाह झाला होता. यापूर्वी अनिल बुलंदशहर येथे राहत होता. हे दोघे वर्षभरापूर्वीच दिल्लीत राहायला आले होते.

रश्मी आणि अनिलचा 6 वर्ष सुखाने संसार

दिल्लीतील रोहिणी भागामध्ये रश्मी आणि अनिल सेक्टर 16 मध्ये भाड्याने घरात राहत होते. लग्नानंतरची काही वर्ष दोघांनी सुखाने संसार केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये प्रचंड वाद होत होते. मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान रश्मीची कारखान्यात काम करणाऱ्या बबलू नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली होती. यावरून अनिल आणि रश्मीमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. या भांडणाबद्दल अनिल त्याचा भाऊ सुनील याला नेहमीच सांगत असतं.

हे सुद्धा वाचा

रश्मी आणि तो घरात एकटेच दिसता पतीचा चढला पारा

अनिल काही कामानिमित्त घराच्या बाहेर गेला होता. तेंव्हा रश्मी एकटीच घरी होती. मात्र, अनिलने घरी परल्यानंतर पाहिले की, बबलू आणि आपली पत्नीसोबत एकटेच घरात आहेत. यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. अनिलने पत्नी रश्मीचा गळा आवळून खून केला आणि नंतर दरवाजा बाहेरून बंद करून घटनास्थळावरून पळ काढला. सुमारे 2 तासानंतर अनिलने त्याचा भाऊ सुनील याला फोनवरून घटनेची माहिती दिली. मात्र, तेंव्हापासून अनिल फरार आहे. पोलिस अनिलचा शोध घेत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.