भावाकडे निघालेल्या विवाहितेची लूट, चोरट्यांनी बाईकसोबत फरफटत नेल्याने मृत्यू
30 वर्षीय उमा पटवाल ही मूळ उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील भानोलीची रहिवासी होती. तिच्या कुटुंबात पती मोहन सिंग आणि दोन मुले आहेत. ती दिल्लीच्या छतरपूर भागात राहत होती.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मंगोलपुरी परिसरात चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रक्षाबंधनासाठी महिला आपल्या भावाच्या घरी जात असताना हा प्रकार घडला होता. जखमी अवस्थेत सापडलेल्या महिलेला पाहून सुरुवातीला हा रस्ता अपघाताचा प्रकार असल्याचा सर्वांचा समज होता. मात्र गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना चोरांनी तिला फरफटत नेल्यामुळे ती जखमी झाल्याचे नंतर उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली आहे.
बेगमपूरचा रहिवासी प्रिन्स आणि सुलतानपुरीचा रहिवासी नरेश अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही पोलिसांनी 26 ऑगस्ट रोजी अटक केली होती.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय उमा पटवाल असे मयत महिलेचे नाव आहे. 22 ऑगस्ट रोजी सकाळी रस्त्यावर फरफटत नेल्यामुळे उमाला गंभीर जखमी अवस्थेत संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेतच होती. त्यामुळे तिची ओळख पटू शकली नव्हती. पोलिसांनी रस्ता अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. त्यानंतर तपासादरम्यान महिलेची ओळख पटली.
दोन मुलांचं मातृछत्र हरपलं
30 वर्षीय उमा पटवाल ही मूळ उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील भानोलीची रहिवासी होती. तिच्या कुटुंबात पती मोहन सिंग आणि दोन मुले आहेत. ती दिल्लीच्या छतरपूर भागात राहत होती. 22 ऑगस्टच्या सकाळी उमा रक्षाबंधनाच्या निमित्त सुलतानपुरी येथे राहणाऱ्या भावाला राखी बांधण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी बदमाशांनी तिची पर्स हिसकावली. मात्र तिने प्रतिकार केल्यावर चोरट्यांनी तिला खेचले आणि बाईकसोबत फरफटत गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती.
पुण्यातही महिलेचा मोबाईल चोरीला
दुसरीकडे, पादचारी महिलेचा मोबाईल आणि पर्स लुटून चोरांनी पळ काढल्याचा प्रकार नुकताच पुण्यात उघडकीस आला होता. हडपसर भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. महिलेने एक किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलागही केला, मात्र ते हाती लागले नाहीत.
संबंधित बातम्या :
CCTV VIDEO | पुण्यात महिलेचा पर्स-मोबाईल लुटून दोघे पसार, पाठलागाचा थरार सीसीटीव्हीत कैद
Pune Crime | पुण्यात रस्त्याने एकटं जात असताना चोरांनी लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात महिलेला वडापाव खाण्याची इच्छा पडली 8 लाखांना! रक्षबंधनाच्याच दिवशी घडली घटना