लग्नाहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार, लिफ्टच्या बहाण्याने तिघांकडून अत्याचार

पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप पीडितेने केला. त्यानंतर बिजनौरचे माजी खासदार भरतेंदू सिंह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.

लग्नाहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार, लिफ्टच्या बहाण्याने तिघांकडून अत्याचार
सात वर्षानंतर लैंगिक अत्याचाराला फुटली वाचा
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 3:53 PM

लखनौ : लग्नाहून परतणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिघांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. दिल्लीची तरुणी नातेवाईकाच्या लग्नानिमित्त उत्तर प्रदेशात गेली असताना बिजनौर जिल्ह्यातील सबळपूर बित्रा गावात ही घटना घडली.

पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप पीडितेने केला. त्यानंतर बिजनौरचे माजी खासदार भरतेंदू सिंह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.

नेमकं काय घडलं?

13 सप्टेंबर रोजी पीडित तरुणी दिल्लीहून बिजनौर येथील एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आली होती. घरी परतण्यासाठी ती दुसऱ्या दिवशी गावाच्या बस स्टँडवर गेली. पीडितेच्या दाव्यानुसार, त्यावेळी तिघा पुरुषांनी त्यांची कार तिच्याजवळ थांबवली आणि तिला कुठे जायचे असल्याचे विचारले.

चाकूच्या धाकाने बलात्कार

आपल्याला दिल्लीला जायचे असल्याचे तिने सांगितले असता, आरोपींनी तिला बिजनोर शहरापर्यंत सोडण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर गाडीत आरोपींनी चाकूच्या धाकाने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला. घटनास्थळी स्थानिक आल्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेले. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी पीडितेला तिच्या ओळखीच्या घरी सोडले. पोलिसांनी आरोपींवर त्वरित कारवाई केली नाही, असा आरोप मुलीने केला आहे

मुंबईत 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, वॉचमनला अटक

दुसरीकडे, गृहनिर्माण सोसायटीतील एका 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला मुंबईत अटक करण्यात आली आहे. कांजूरमार्ग येथील संबंधित सोसायटीत आरोपी वॉचमन गेल्या महिनाभरापासून काम करत होता. पीडितेने शुक्रवारी आई-वडिलांकडे आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कांजूरमार्ग येथील हनुमान गल्ली येथे राहणारा 29 वर्षीय आरोपी 15 ऑगस्टपासून मुलीचा छळ करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

साकीनाका बलात्कार प्रकरण

दरम्यान, मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं होतं. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार कंट्रोल रुमला प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

तीन दिवस मृत्यूशी झुंज

या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा :

हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

तरुणीसोबत आधी दोस्ती केली, नंतर नोकरीचं आमिष, कारमध्येच सामूहिक बलात्कार, पीडितेला हायवेवर फेकून दिलं

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.