शेजारच्यावर चाकूने वार, संतापात जीव घेण्याचा इरादा, कोर्टाकडून तरुणाला गुरुद्वारमध्ये सेवा करण्याची शिक्षा
दिल्ली हायकोर्टाने एका 21 वर्षीय युवकाला अनोखी शिक्षा दिली आहे (delhi high court directs community service at gurdwara to youth).
नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने एका 21 वर्षीय युवकाला अनोखी शिक्षा सुनावली आहे. या युवकाने शेजारच्या व्यक्तीला मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्यावर संबंधित व्यक्तीचा हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. याच प्रकरणावरुन कोर्टात खटला सुरु होता. याप्रकरणी दिल्ली कोर्टाने आरोपीला दिल्लीच्या गुरुद्वार बंगाला साहिब येथे एक महिना सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. “तरुणांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं. त्यांनी कायद्याला हाती घेऊ नये”, असं न्यायाधीशांनी शिक्षा घोषित करताना म्हटलं (delhi high court directs community service at gurdwara to youth).
नेमकं प्रकरण काय?
आरोपी मोहम्मद उमिर नावाच्या तरुणावर त्याच्या शेजारच्यांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. उमिरने आपल्या शेजारच्यावर चाकूने वार केला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याअंतर्गत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते (delhi high court directs community service at gurdwara to youth).
दिल्ली हायकोर्टाचे न्यायधीश सुब्रमण्यम प्रसाद यांनी उमिर विरोधात दाखल करण्यात आलेला एफआरआय रद्द केला. आरोपी मोहम्मद उमिरचं वय अवघं 21 वर्ष आहे. त्याचं अजून संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे, असं न्यायाधीश म्हणाले. दरम्यान, पीडित पक्षानेदेखील आरोपीसोबत सामंजस्य करुन विषय मिटून टाकला. पण या प्रकरणी न्यायाधीशांनी आरोपीला एक महिना गुरुद्वारमध्ये सेवा करण्याची शिक्षा सुनावली.
शिक्षा नेमकी काय?
दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार आरोपीला 16 मार्चे ते 16 एप्रिल या काळात गुरुद्वार बंगला साहिबमध्ये सेवा करावी लागेल. एक महिना तिथे सेवा केल्यानंतर गुरुद्वार बंगला साहेब येथून सर्टिफिकेट मिळेल. या सर्टिफिकेटमध्ये आरोपी उमिरने कोर्टाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करुन सेवा केलीय, असं म्हटलेलं असावं. याशिवाय आरोपीला 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आला. त्याचबरोबर भविष्यात अशा गुन्ह्यांपासून लांब राहण्याची ताकीद कोर्टाकडून देण्यात आली.