गोड बोलून भोळ्या मुलींसोबत मैत्री, नंतर नातेवाईक आजारी असल्याचं सांगत पैशांसाठी याचना, भयानक चोरटा अखेर जेरबंद

दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे (Delhi Police arrested accused who trap women for money).

गोड बोलून भोळ्या मुलींसोबत मैत्री, नंतर नातेवाईक आजारी असल्याचं सांगत पैशांसाठी याचना, भयानक चोरटा अखेर जेरबंद
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 8:56 PM

नवी दिल्ली : चोरटे चोरी करण्यासाठी किंवा लोकांना लुबाडण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतील याचा कधीच अंदाज बांधता येणार नाही. दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये तर विचित्र प्रकार समोर आला आहे. एक 28 वर्षांचा चोरटा भोळ्या मुलींना गोड बोलून मैत्रीच्या जाळ्यात अडकवायचा. मैत्री घट्ट झाली की आपल्या घरातील कुटुंबातील कुठलातरी एक नातेवाईक दुर्धर आजाराने त्रस्त आहे, असं सांगत मुलींकडून पैसे उकळायचा. यासाठी तो मुलींना भावनिकपणे विचारांमध्ये अडकवायचा. मुलींना भावनिकतेने ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर मुलींनी एकदा पैशे दिले की तो आपला मोबाईलमधील सीम कार्ड फेकून लंपास व्हायचा (Delhi Police arrested accused who trap women for money).

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये मोहित गोयल नावाचा 28 वर्षीय तरुण गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होता. त्याने कर्जासंबंधित एका कारणासाठी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात एका महिलेची भेट घेतली. महिलेसोबतच्या पहिल्या भेटीनंतर तो तिच्या सतत संपर्कात होता. यातूनच त्यांच्यात मैत्री झाली. काही दिवसांनंतर मोहित एका मुलाला सोबत घेऊन महिलेच्या भेटीसाठी गेला. संबंधित मुलगा हा आपला पुतण्या असून त्याला कर्करोगाचे निदान झालंय, असं त्याने महिलेला सांगितलं. पुतण्याच्या उपचारासाठी पैशांची नितांत आवश्यकता असून त्याने महिलेकडे पैसे मागितले.

आरोपीने महिलेच्या नावाने हप्त्यावर दोन मोबाईलही घेतले

महिलेने भावनेच्या भरात मोहितला पैसे दिले. तिने आरोपी मोहितला काही रोख रक्कम दिली. त्याचबरोबर 75 हजार रुपये ऑनलाईन दिले. विशष म्हणजे आरोपीने महिलेच्या नावाने हप्त्यावर दोन मोबाईलही घेतले. मात्र, ते मोबाईल त्याने दुसऱ्याला विकले. त्यानंतर तो फरार झाला. त्याने स्वत:चा मोबाईल नंबर बंद केला. याशिवाय तो जिथे वास्तव्यास होता तिथून सामान गुंडाळून पळून गेला.

पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या

दरम्यान, सुरुवातीला महिलेने जेव्हा आरोपीकडून पैसे मागितले तेव्हा त्याने खोटे स्क्रिनशॉट पाठवून पैसे पाठवल्याचं नाटक केलं. त्यानंतर त्याने मोबाईलच बंद केला. महिलेने त्याला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला. संपर्क होत नाही हे लक्षात आल्यावर तिने शेवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन अखेर चोरट्याला बेड्या ठोकल्या (Delhi Police arrested accused who trap women for money).

पोलिसांची प्रतिक्रिया

आरोपी मोहित विरोधात कलम 406 आणि 34 क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी वारंवार आपला मोबाईल नंबर आणि ठिकाण बदलवत असल्याचं तपासात उघड झालंय. त्याने बऱ्याच भोळ्या मुलींना फसवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याने आणखी किती मुली किंवा महिलांना फसवून पैसे उकळले याचा तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संतोष कुमार मीणा यांनी दिली.

हेही वाचा : जे हात कामाच्या शोधात होते ते दगडापर्यंत पोहोचले पण रिक्षा चालकाला ठेचण्यासाठी? नागपुरात नेमकी हत्या का?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.