सीसीटीव्हीचा क्लू आणि चोरटे जेरबंद, कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आजीबाईंना लुटणारे भामटे गजाआड
आरोपींनी पाच लुटीच्या घटनांची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सर्व लुटलेले दागिने हस्तगत केले आहेत (Dombivli police arrest chain snatchers).
ठाणे : कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 75 वर्षीय आजीबाईच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेणाऱ्या तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांना यश आलं आहे. हे आरोपी डोंबिवलीतील ज्योतीनगर परिसरात वास्तव्यास होते. या आरोपींनी पाच लुटीच्या घटनांची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सर्व लुटलेले दागिने हस्तगत केले आहेत (Dombivli police arrest chain snatchers).
कल्याण पूर्वेतील श्रीकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या 75 वर्षीय आजी चंद्रप्रभा पिळणकर या 12 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या. रस्त्यावर कचरा टाकून घरी परतत असताना दोन बाईकस्वार चोरटे आजीबाईंच्या दिशेने आले. त्यांनी आजीबाईच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्यांची चैन हिसकावून पळ काढला (Dombivli police arrest chain snatchers).
चोरट्यांनी जोरदार धक्का दिल्याने आजी भर रस्त्यात खाली पडल्या. त्यांच्या गळ्याला आणि पायाला दुखापत झाली. काही जणांनी ही घटना पाहून चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरट्यांनी धूम ठोकली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या परिसरात या घटनेआधी अशाचप्रकारच्या अन्य दोन घटनादेखील घडल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरीत आरोपींना अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. अखेर 18 दिवसात चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं.
पोलिसांनी तपास कसा केला?
टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या साह्याने आरोपींचा शोध सुरु केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस आरोपींच्या शोधात होते. या तपासात अखेर टिळकनगर पोलिसांनी यश आले. डिसीपी विवेक पानसरे, एसीपी जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. या प्रकरणातील दोघे आरोपी विशाल वाघ, शंकर जाधव यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या दोघांना मदत करणारा गजानन घाडी याला सुद्धा अटक करण्यात आली.
या तिघांनी आतापर्यंत पाच गुन्ह्यांची कबूली दिली आहे. त्यामध्ये टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन सोनसाखळी चोरीच्या घटना आहेत. एक लूटीची घटना मानपाडा आणि एक घटना महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागीने हस्तगत करुन पोलिसांनी पूढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा : कंगनाशी कौटुंबीक नातं, राजकीय संबंध जोडू नका; राज ठाकरेंच्या ‘मसल मॅन’ची प्रतिक्रिया