माजी पोलीस अधिकाऱ्याकडून लैंगिक शोषण, दोन महिलांची हत्या, घरात 14 मृतदेहांचा खच, हत्येचं गूढ कसं उलगडणार?

एल सल्वाडोर हा देश सध्या एका घटनेमुळे प्रचंड चर्चेत आला आहे (El Salvador Femicide Case 14 bodies recovered from former police officer)

माजी पोलीस अधिकाऱ्याकडून लैंगिक शोषण, दोन महिलांची हत्या, घरात 14 मृतदेहांचा खच, हत्येचं गूढ कसं उलगडणार?
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 4:49 PM

एल सल्वाडोर (मध्य अमेरिका) : गुन्ह्यांशी संबंधित काही चित्रपटांच्या कथा एकदम रहस्यमय असतात. असा रहस्यमय चित्रपट सुरु होतो तेव्हाच तो काहितरी रहस्य घेऊन सुरु होतो. जेव्हा त्यातील पहिलं रहस्य उलगडतं तेव्हा ते त्यासोबत आणखी काही प्रश्न घेऊन येतं. आपल्याला हव्या असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं जाणवत असताना लगेच दुसरा रहस्यमय प्रश्न उभा राहतो. मग तो सोडवण्यासाठी आपण तो चित्रपट पुढे पाहतो. जसजसं आपण पुढे जातो तसंतसं रहस्य आणखी गूढ आणि खोलात जातं. तशाच काही क्राईमच्या घटना आजकाल घडत आहेत (El Salvador Femicide Case 14 bodies recovered from former police officer).

मध्य अमेरिका खंडातील एल सल्वाडोर हा देश सध्या त्यामुळेच चर्चेत आला आहे. या देशातील एक माजी पोलीस कर्मचाऱ्याने एका 57 वर्षीय महिलेचा आणि तिच्या 27 वर्षीय लेकीचा खून केला. तो त्यांचा का खून करतो? याचा तपास सुरु असतानाच आता नवी माहिती समोर आलीय. त्याच्या राहत्या घरात तब्बल 14 मृतदेह मिळाले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सल्वाडोरच्या सरकारी वकिलांनी गुरुवारी (20 मे) याबाबत माहिती दिलीय. संबंधित घटना समोर आल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष सल्वाडोर देशाकडे वेधले गेले आहे (El Salvador Femicide Case 14 bodies recovered from former police officer).

नेमकं प्रकरण काय?

सल्वाडोर देशात माजी पोलीस अधिकारी ओसोरियो शावेज याच्यावर 57 वर्षीय महिला आणि तिची 27 वर्षीय मुलीच्या हत्येचा आरोप आहे. संबंधित आरोपी हा 51 वर्षांचा आहे. या हत्येआधी त्याच्यावर लैंगिक शोषणाचेही आरोप करण्यात आले होते. आरोपी शावेजने दोन आठवड्यांपूर्वी दोन महिलांच्या हत्येची कबूली दिली होती. त्यानंतर पोलीस त्याच्या घराची झळती घेण्यासाठी गेले. पण तिथे धक्कादाक गोष्टी समोर आल्या.

आरोपीच्या घरात 14 मृतदेह पुरलेले

पोलिसांनी आरोपी शावेजच्या घराची झळती घेतली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण पोलिसांना आरोपीच्या घरात आठ खड्ड्यांमध्ये एकावर एक पुरलेले असे 14 मृतदेह मिळाले. ते मृतदेह जवळपास दोन वर्षांपासून पुरण्यात आले असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आरोपीने कुणाकुणाची हत्या केली आणि घरात पुरलं याबाबतची माहिती सध्या समोर आलेली नाही.

हत्या करण्यामागे मोठी खतरनाक टोळी असल्याचा अंदाज

या हत्या करण्यामागे मोठी खतरनाक टोळी असल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला आहे. तसेच या टोळीचं जवळपास एक दशकापासून क्रूर कारस्थान सुरु असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या क्रूर कृत्यात आरोपीसोबत सैन्यातील काही अधिकारी आणि पोलीस कर्मचारीदेखील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील खरं-खोटं तपासाअंती बाहेर येईल. मात्र, या प्रकरणात रोज वेगवेगळी माहिती समोर येत असल्याने या घटनांमध्ये गूढ वाढत जाताना दिसत आहे.

पोलिसांचा तपास सुरु

सरकारी वकिलांनी काल या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर आरोपीच्या घरातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. यावेळी आरोपीच्या घराबाहेर शेकडो लोकांनी गर्दी केली होती. मृतकांमध्ये आपले नातेवाईक असू शकतात, असं या गर्दीतील अनेक लोकांना वाटत होतं. पोलिसांचा सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे. मृतदेह नेमकी कुणाची आहेत, ती कधी पुरले, हत्या कधी करण्यात आली, यामगे कुणाची टोळी आहे? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सध्या तरी पोलिसांकडे नाही.

हेही वाचा : बहिणीसोबत भांडताना ओरडल्याचा राग, पुण्यात 13 वर्षांच्या मुलाने कांदा चिरताना वडिलांना भोसकलं

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.