Fadnavis| आपल्याच सुनेच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती विद्या चव्हाण, ‘डान्सिंग डॉल’वर अमृता फडणवीसांचं सणसणीत उत्तर

विद्या चव्हाण यांनी या नोटीसीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करत अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, अमृता फडणवीस काहीही करू शकतात. त्यांनी काय करावे, काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी मिसेस फडणवीसांबद्दल काहीही वाईट बोलले नाही.

Fadnavis| आपल्याच सुनेच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती विद्या चव्हाण, 'डान्सिंग डॉल'वर अमृता फडणवीसांचं सणसणीत उत्तर
Amrita Fadnavis, Vidya Chavan
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 10:47 AM

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया याचा निषेध नोंदवताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मध्ये ओढत त्यांना डान्सिंग डॉल असे संबोधले. त्यामुळे हे वक्तव्य त्यांना महागात पडले असून, अमृता फडणवीस यांनी आज विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत निर्वाणीचा इशाराही दिलाय.

नेमके प्रकरण काय?

जितेन गजारिया याने रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. गजारिया हा भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला. या प्रकरणी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, हे सर्व प्रकरण पाहून मला मजेदार किस्सा आठवला. भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले, असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावे वाटते, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा गुदारून नोटीस पाठवलीय.

ट्वीट करून इशाराही…

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना पाठविलेली नोटीस ट्वीट केली आहे. त्यावर एक सणसणीत प्रतिक्रियाही दिली आहे. त्यात अमृता फडणवीस म्हणतात, आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! @Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण !

चव्हाणांचे प्रत्युत्तर

विद्या चव्हाण यांनी या नोटीसीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करत अमृता फडणवीस यांना टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, अमृता फडणवीस काहीही करू शकतात. त्यांनी काय करावे, काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी मिसेस फडणवीसांबद्दल काहीही वाईट बोलले नाही. माफी मागण्याचे काहीही कारण नाही. खरे तर भाजपवाल्यांना माझ्या घरात नाकं खुपसण्याचं गरज नाही. त्यावर कोर्टाचा निर्णय झालाय. मी सुनेला छळलंय, असं त्या कसं म्हणू शकतात. याचा त्यांनी काही पुरावा द्यावा. चांगली काम करणाऱ्यांची बदनामी सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

प्रकरण तापणार

राज्यात येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. त्यातही मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. हे पाहता महाविकास आघाडी सरकारचे नेते विरुद्ध भाजप असे चित्र राज्यभर पाहायला मिळते आहे. आता अमृता फडणवीस यांनी नोटीस पाठवल्यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळतील. निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणावर कलगीतुरा रंगणार, अशीच चिन्हे आहेत.

इतर बातम्याः

Gold Price|ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना…भावात चक्क 600 रुपयांची घसरण, चांदीही 60 हजारांखाली!

Nashik Omicron| कोरोनाची वावटळ; रुग्णसंख्या 2 हजारांच्या घरात, कारभारी बाहेर पडताना जरा जपून…!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.