आधी मुलगी मिळेना, एक लाख देऊन लग्न केलं, लग्न लागताच नवरी अर्ध्या वाटेतूनच पळून गेली

मुजफ्परपूरचा शेती करणारा देवेंद्र या तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती (Fake brides gang robbery groom).

आधी मुलगी मिळेना, एक लाख देऊन लग्न केलं, लग्न लागताच नवरी अर्ध्या वाटेतूनच पळून गेली
Marriage
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 4:54 PM

लखनऊ : देशावर सध्या कोरोनाचं सावट आहे. कोरोना संकटामुळे देशात लॉकडाऊन लावण्याची नामुष्की ओढावली होती. या लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बेरोजगार तरुणांना आज लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड होऊन बसलं आहे. याशिवाय शेती करणाऱ्या अनेक तरुणांनाही लग्नासाठी मुलगी मिळत नाहीय. याच विचित्र परिस्थितीतून उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील एक तरुण जात होता. अखेर त्याला एका ओळखीच्या व्यक्तीने एका मुलीला पैशांची गरज आहे. तिला एक लाख रुपये देऊन तिच्याशी लग्न कर, असं सांगितलं. तो यासाठी तयार झाला. मात्र, काहीतरी वेगळंच घडलं. संबंधित मुलगी ही लग्न केल्यानंतर लगेच पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. त्यामुळे पीडित तरुणावर मनस्तापाची वेळ आली (Fake brides gang robbery groom).

मेरठच्या परतापूर येथील शिव मंदिरात लग्न

संबंधित घटना ही मेरठच्या परतापूर या भागातील आहे. मुजफ्परपूरचा शेती करणारा देवेंद्र या तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. दरम्यान तो रामनगरच्या संदीप नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला. त्याने संदीपजवळ आपलं दु:ख व्यक्त केलं. तेव्हा संदीपने त्याला एक मुलगी आहे, असं सांगितलं. पण त्या मुलीला सध्या पैशांची आवश्यकता असल्याचं त्याने सांगितलं. देवेंद्र तिला पैशांची मदत करण्यास तयार झाला. त्यानंतर देवेंद्रचे कुटुंबिय मुलीला भेटण्यासाठी गेले. संदीपने देवेंद्र आणि मुलीची भेट घालवून दिली. त्यानंतर दोघांचं लग्न ठरवण्यात आलं.

लग्नानंतर तरुणाने मध्यस्थीला एक लाख रोख दिले

देवेंद्रचं ठरल्याप्रमाणे संबंधित मुलीशी रविवारी परतारपूर येथील शिव मंदिरात लग्न झालं. त्यानंतर त्याने लग्नासाठी मध्यस्ती केलेल्या संदीप याच्याजवळ त्याने ठरल्यानुसार एक लाख रुपये दिले. त्यानंतर तो नवरीला घेऊन त्याच्या घरी मुजफ्फरपूरच्या दिशेला निघाला (Fake brides gang robbery groom).

नवरीने हॉटेलजवळ गाडी थांबवली

दरम्यान, नवरीने हायवे वर जेवणाच्या बहाण्याने गाडी थांबवली. तिथे तिने पीडित तरुण आणि त्याच्या कुटुंबियाला चकवा दिला. ती गाडीतील सर्व दागिने, कपडे आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली. पीडित तरुणाने आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, ती सापडली नाही. अखेर तो परतापूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेला. तिथे त्याने सर्व घटना पोलिसांना सांगितली. त्याने लग्नासाठी मध्यस्थी केलेल्या संदीप आणि नवरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांचं पीडित तरुणाला आश्वासन

पोलिसांनी देवेंद्रची बाजू ऐकून गु्न्हा दाखल केला आहे. पोलीस हॉटेल आणि शिव मंदिराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. पीडित तरुणाला नक्की न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

हेही वाचा : अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत घटना, त्या खुनाचं कोडं उलगडलं, पहिल्यांदाच बालाजीच्या मृत्यूचं कारण उघड

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.