ती कामयानी एक्सप्रेसमध्ये चढली, सोबत कुणी नाही बघून तोही चढला, पोलीस असल्याचं बतावलं आणि…….

कल्याणच्या एका महिलेला ट्रेनमध्ये विचित्र अनुभव आला आहे. खरंतर ती उत्तर प्रदेशला निघाली होती. मात्र, तिला प्रवासादरम्यान विचित्र अनुभव आल्याने तिला मनस्तापाला बळी पडावं लागलं (Fake Police looted womans' mobile and Purse in Kamayani express)

ती कामयानी एक्सप्रेसमध्ये चढली, सोबत कुणी नाही बघून तोही चढला, पोलीस असल्याचं बतावलं आणि.......
पोलीस असल्याचं भासवत प्रवाशांची लूट, उत्तर प्रदेशात जाणाऱ्या रेल्वे ट्रेनमध्ये धक्कादायक प्रकार उघड
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:43 AM

मुंबई : कल्याणच्या एका महिलेला ट्रेनमध्ये विचित्र अनुभव आला आहे. खरंतर ती उत्तर प्रदेशला निघाली होती. मात्र, तिला प्रवासादरम्यान विचित्र अनुभव आल्याने तिला मनस्तापाला बळी पडावं लागलं. ट्रेनमध्ये तिला एका इसमाने पोलीस असल्याचं भासवत तिची चौकशी केली. त्यानंतर तिला लुबाडण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने ती लुबाडण्यासापासून बचावली. तिने वेळीच आरोपी विरोधात बंड पुकारल्याने पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलं. त्यानंतर संबंधित पोलीस हा वॉचमन असल्याचं समोर आलं (Fake Police looted womans’ mobile and Purse in Kamayani express).

नेमकं प्रकरण काय?

कल्याणला राहणारी शारदा शिरसाट नावाची एक तरुणी आज दुपारी कामयानी एक्सप्रेसमध्ये चढली. ती आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशला निघाली होती. तिच्या मागे एक व्यक्ती ट्रेनमध्ये चढला. त्याने स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून शारदा शिरसाट या तरुणीशी बातचीत सुरु केली. कसारा स्टेशन येण्याआधीच त्याने शारदाकडून मोबाईल आणि पर्स हिसकावून घेतली. काही बोललीस तर ठार मारणार, अशी धमकी दिली. तोपर्यंत कसारा स्टेशन आले होते. गाडी फलाटाला थांबली. याचा फायदा घेत आरोपी ट्रेनमधून उतरुन पळायला लागला.

आरोपीला बेड्या

शारदा शिरसाट हिने आरडाओरडा सुरु केला. फलाटावरील पोलियांनी पळून जाणाऱ्या व्यक्तिचा पाठलाग करुन पकडले. त्याची चौकशी केली असता तो पोलीस नसून वॉचमनची नोकरी करत असल्याचं उघड झालं. त्याने अशाप्रकारे अनेक लोकांना लुबाडल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे (Fake Police looted womans’ mobile and Purse in Kamayani express).

पोलिसांची प्रतिक्रिया

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरिक्षक अर्चना दुसाने यांनी याप्रकरणाची सविस्तर माहिती दिली. “संबंधित आरोपीचं नाव सोपान आव्हाड असं असल्याचं समोर आलं आहे. तो कल्याण पश्चिमेतील मल्हारनगरात राहतो. तो वॉचमन आहे. सोपान याला अटक करण्यात आली आहे. सोपान आव्हाड याने आतापर्यंत किती जणांची लूट केली आहे याचा तपास पोलीस करीत आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : रात्रीच्या अंधारात आरोपीलाच पती समजली, नवऱ्याशेजारी झोपलेल्या विवाहितेवर घरात बलात्कार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.