50 रुपये चोरल्याच्या रागातून बापाची मुलाला बेदम मारहाण; पुढे जे झाले ते पाहून पोलीसही चक्रावले

50 रुपये चोरल्याच्या रागातून बापानेच दहा वर्षांच्या चिमुकल्याला आपटून मारल्याची धक्कादायक घटना कळव्यामधून समोर आली आहे. कळव्याच्या वाघोबानगरातील हा प्रकार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी वडिलांना अटक केली आहे.

50 रुपये चोरल्याच्या रागातून बापाची मुलाला बेदम मारहाण; पुढे जे झाले ते पाहून पोलीसही चक्रावले
डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती, काळवीटाचे कातडे जप्त
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 2:31 PM

ठाणे :  50 रुपये चोरल्याच्या रागातून बापानेच दहा वर्षांच्या चिमुकल्याला आपटून मारल्याची धक्कादायक घटना कळव्यामधून समोर आली आहे. कळव्याच्या वाघोबानगरातील हा प्रकार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी वडिलांना अटक केली आहे. संदीप उर्फ बबलू प्रजापती असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुलाला बेदम मारहाण

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी संदीप ऊर्फ बबलू प्रजापती हा आपली दोन मुले आणि बायकोसोबत कळवा वाघोबानगर येथील ठाकूरपाडा झोपडप्टटीमध्ये राहातो. 29 डिसेंबर रोजी दुपारी त्याचा दहा वर्षीय मुलाने घरातून 50 रुपये चोरले होते. या गोष्टीचा राग आल्याने आरोपीने मुलाला बेदम मारहण केली, या मारहाणीत मुलगा बेशुद्ध पडला त्याचे हातपाय फ्रॅक्चर झाले. तसेच त्याच्या डोक्याची कवटी देखील फुटली. त्यानंतर संदीपने त्या मुलाला तसेच चादरीत गुंडाळून ठेवले व घराची कडी लावून तो बाहेर पडला.

बारा तास ठेवले कोंडून

दरम्यान या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी दिली. मुलाला बेदम मारहाण करून, घरात बारा तासांपेक्षा अधिक काळ कोंडून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा उघडला. समोरचे दृष्य पाहून पोलीसही हादरून गेले. त्यांना एका चादरीत गुंडालेला बेशुद्ध अवस्थेतील मुलगा आढळून आला. पोलिसांनी तातडीने या मुलाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाल्याने डॉक्टरांनी मुलाला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

पैशांसाठी नातवानेच रचला कट, दरोडेखोरांना दिली आजोबांची टीप; पनवेलमधील 27 तोळे दागीन्यांच्या लुटीचे रहस्य उलगडले

अल्पवयीन मुलीचा सौदा; दोन महिलांना अटक; पोलिसांनी ‘अशी’ केली मुलीची सुटका

Pune crime | विवाहबाह्य संबंधाचं झेंगाट, बायकोचा राग अनावर, नातेवाईकांच्या हाती स्टंप, शेवटी जे घडलं त्यानं पुणं हादरलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.