Pune crime : घरातले वाद विकोपाला! वडिलानेच केली मुलाची हत्या, पिंपरी चिंचवडच्या मोशीतली दुर्दैवी घटना
युवराज आपल्या आई-वडील आणि भावासोबत मोशी येथे राहत होता. मागील काही दिवसांपासून त्याचे आई वडिलांशी भांडत होत असे. त्यांच्यात वाद होत होते. गुरुवारी रात्रीदेखील युवराज आणि त्याच्या कुटुंबीयांत वाद झाला.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात सकाळी एक युवकाची वडिलांनीच हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवराज साळवे असे मृत युवकाचे नाव आहे. युवराज आपल्या आई वडील आणि भावासोबत राहत होता. काही दिवसांपासून युवराजचे आई-वडिलांशी वारंवार क्षुल्लक कारणावरून भांडणे होत होते. रात्रीदेखील युवराज आणि कुटुंबीयांमध्ये वाद (Clashes) झाला, मात्र त्रस्त झालेल्या पित्याने आई आणि मोठ्या मुलाला घराबाहेर काढून युवराजची घरात हत्या केली. हत्येच्या घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल होत, आरोपी वडिलांना अटक केली. पिंपरी चिंचवडमधील मोशी या परिसरात ही घटना घडली. याबाबत मृत मुलाच्या आईने फिर्याद दिली, त्यानंतर मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला पोलिसांनी अटक (Arrest) केली.
घरात रोजच होत होती भांडणे
मृत युवराजच्या आईने सांगितले, की तो त्याच्या वडिलांना मारहाणही करत असे. आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. त्याच्या वडिलांनी आणि भावाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. काल तर तो म्हणाला, की मी तुमच्यापैकी एकाला मारणार. या भीतीने मी रात्रभर त्याच्याजवळ बसून राहिले तर त्याने मला आणि त्याच्या भावाला ढकलून बाहेर काढले. त्यानंतर तो बाहेर गेला आणि दगडे घेऊन आला. आम्हाला घराच्या बाहेर काढले. आतून कडी लावली आणि त्याच्या वडिलांना मारायला लागला. त्यानंतर आत काय घडले आम्हाला काहीच माहीती नाही, असे मृत युवराजच्या आईने सांगितले.
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज आपल्या आई-वडील आणि भावासोबत मोशी येथे राहत होता. मागील काही दिवसांपासून त्याचे आई वडिलांशी भांडत होत असे. त्यांच्यात वाद होत होते. गुरुवारी रात्रीदेखील युवराज आणि त्याच्या कुटुंबीयांत वाद झाला. यावेळी त्रस्त पित्याने युवराजची घरात हत्या केली. काल सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.