AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 वर्षीय तरुणीशी पळून जाऊन लग्न, रिक्षाचालकाची हत्या, 5 जणांना कोठडी

प्रेमविवाहाच्या वादातून एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये गुरुवारी (13 मे) घडली (Auto driver murdered in Ambernath over love marriage dispute).

20 वर्षीय तरुणीशी पळून जाऊन लग्न, रिक्षाचालकाची हत्या, 5 जणांना कोठडी
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: May 21, 2021 | 11:54 AM
Share

अंबरनाथ (ठाणे) : प्रेमविवाहाच्या वादातून एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये गुरुवारी (13 मे) घडली होती (Auto driver murdered in Ambernath over love marriage dispute). याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विजय नवलगिरे असं हत्या करण्यात आलेल्या 30 वर्षीय रिक्षाचालकाचं नाव होतं. विजय याने 11 महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेच्या एका 20 वर्षीय तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं होतं. यावरून त्या परिसरातल्या काही तरुणांशी विजयचे वाद निर्माण झाले होते. त्यावरूनच विजय हा गुरुवारी घरी असताना 8 ते 9 तरुण विजयच्या घरी आले आणि दार तोडून घरात घुसले. यानंतर त्यांनी विजयवर कटरने वार केले. त्यानंतर त्यांनी डोक्यात फरशी घातली आणि नंतर दगड घालून त्याची हत्या केली (Auto driver murdered in Ambernath over love marriage dispute).

पाच जणांना बेड्या, चौघांचा शोध सुरु

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पळून जात असलेल्या दोन आरोपींना लगेचच बेड्या ठोकल्या. तर उर्वरित तिघांना रात्री अटक करण्यात आली. या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता या प्रकरणात फरार असलेल्या इतर 4 आरोपींचा पोलीस शोध घेतायत. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आरोपींकडून अनेक दिवसांपासून मृतकाचा छळ

विजय याने 11 महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमला राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर विजय आपल्या पत्नीसह अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातले काही तरुण विजयला गेले काही दिवस त्रास देत होते. आमच्या भागातल्या मुलीशी प्रेमविवाह का केला? असं म्हणत गेल्या काही दिवसांपासून हे तरुण विजयला त्रास देत होते. या वादातूनच आज दुपारी 3.30 च्या सुमारास 5 ते 7 तरुण विजयच्या घरी आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करीत विजयला घराबाहेर आणले. त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली. गुंड तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत, यानंतर विजयच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची हत्या करण्यात आली.

मोबाईलमध्ये घटना चित्रित

मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरू असताना एका अज्ञात वाटसरूने हा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहताच आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पळून जात असताना दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, कुख्यात गुंडाची हत्या

बारबालांना लपवण्यासाठी तयखाना बनवला, लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या बारवर थेट बुलडोझर फिरवला

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.