Crime | सासऱ्याचा खून करुन प्रियकरासोबत फरार, महिलेला सात दिवसांत बेड्या, हत्येचं नेमकं कारण काय ?
संपत्ती आणि पैशाच्या लालसेपोटी हरियाणामधील (Haryana) फरीदाबादमध्ये एक धक्कादयक अशी घटना घडली आहे. येथे संपत्तीसाठी सुनेने आपल्याच सासऱ्या चक्क खून (Murder)केला आहे. आपल्या प्रियकराच्या माध्यमातून या महिलेने सासऱ्याला गोळ्या घालून संपवलं आहे
चंदीगड : संपत्ती आणि पैशाच्या लालसेपोटी हरियाणामधील (Haryana) फरीदाबादमध्ये एक धक्कादयक अशी घटना घडली आहे. येथे संपत्तीसाठी सुनेने आपल्याच सासऱ्या चक्क खून (Murder)केला आहे. आपल्या प्रियकराच्या माध्यमातून या महिलेने सासऱ्याला गोळ्या घालून संपवलं आहे. खून करण्यासाठी महिलेनेच प्रियकराला पैसे दिल्याचे तपासात समोर आले आहे. मागील आठवड्याभरापूर्वी वल्लभगड येथेली न्यू फ्रेंड्स कॉलिनी येथे हे हत्याकांड घडले होते. त्यानंतर पोलिसांनी (Police)आठवड्याभरात या खूनचा उलगडा केला आहे. सुनेनेच ही हत्या घडवून आणल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेचे नाव गीता तर खून झालेल्या माणसाचे नाव भगतसिंह असे आहे. पोलिसांनी या खून प्रकणात आरोपी महिला गीता हिला बेड्या ठोकल्या असून तिचा प्रियकर कालिया फरार आहे.
हत्येचा विचार मनात का आला ?
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गीता आपला पती विनोदसोबत वल्लभगड येथे राहत होती. भगतसिंह नावाचे या महिलेचे सासरे हेदेखील त्यांच्यासोबत राहत होते. आरोपी महिलेचे ते सावत्र सासरे होते. भगतसिंह यांना सुरज नावाचा दुसरा एक मुलगा होता. त्याचा अपघातात मृत्यू झाला होता. सुरजचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नीदेखील आपल्या माहेरी निघून गेली. सख्ख्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भगतसिंह यांना आता विनोद म्हणजेच आरोपी महिलेचा नवरा असा एकच सावत्र मुलगा राहिला. आरोपी महिला गीताचा डोळा सावत्र सासऱ्याच्या संपत्तीवर होता. सारी संपत्ती माझ्या नावे करावी म्हणून आरोपी महिला गीता तिचे सासरे म्हणजेच भगतसिंह यांना मागील काही दिवसांपासून सतत त्रास देत होती. मात्र भगतसिंह यांनी तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला. याच कारणामुळे आरोपी महिलेने त्यांना ठार करण्याची योजना आखली. याबाबतचे सविस्तर वृत्त आजतकने दिले आहे.
खून नेमका कसा केला ?
संपत्ती नावे करत नसल्यामुळे गीताला आपल्या सासऱ्याचा राग आला होता. तिने आपल्याच सासऱ्याचा खून करण्याची योजना आखली. त्यासाठी तिने आपला प्रेमी म्हणजेच दलीप उर्फ सॅंडी उर्फ कालिया याची मदत घेतली. हे दोघे एकमेकांना मागील सात वर्षांपासून ओळखत होते. आरोपी महिला गीताने सासऱ्याला संपवण्यासाठी आपल्या प्रियकराला बंदूक आणायला सांगितली. त्यासाठी तिने कालिया याला चार हजार रुपये दिले. तर या पैशांत कालियाने गीताला बंदूक, दोन जिवंत काडतूस तसेच झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. तसेच एका दिवशी सासऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन महिलेचा प्रेमी कालियाने तिच्या सासऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली.
महिलेला बेड्या, प्रियकर फरार
दरम्यान, खून केल्यानंतर दोघांनाही घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यांनी बदरपूरच्या सीमेवर एक खोली भाड्याने घेतली होती. येथेचे ते मागील आठ दिवसांपासून राहत होते. मात्र डीएलएफ क्राईम ब्रांचचे पोलीस अनिल कुमार यांच्या टीमने महिलेला ताब्यात घेतले. सध्या महिलेचा प्रेमी दलीप उर्फ कालिया फरार आहे.
इतर बातम्या :
Nanded Crime : नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार, आरोपी अटक
Kalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Borivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या