जाण्याची वेळ आली, इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट, सौंदर्यवतीच्या अपघाती मृत्यूनंतर आईचा आत्महत्येचा प्रयत्न

अॅन्सी कबीरच्या आईने झोपेच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

जाण्याची वेळ आली, इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट, सौंदर्यवतीच्या अपघाती मृत्यूनंतर आईचा आत्महत्येचा प्रयत्न
Miss Kerala Winner Ansi Kabeer
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 10:03 AM

तिरुअनंतपुरम : ‘मिस केरळ 2019’ या सौंदर्य स्पर्धेची विजेती अॅन्सी कबीर (Ansi Kabeer) आणि उपविजेती अंजना शाजन यांचा (Anjana Shajan) दोन दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर अॅन्सीच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अॅन्सी कबीरच्या आईने झोपेच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. टीव्हीवरील बातम्यांमधून तिला अपघाताची माहिती मिळाली आणि तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या. आम्हाला ती बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि आम्ही तातडीने रुग्णालयात दाखल केले, असं नातेवाईकांनी सांगितलं.

इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट

शवविच्छेदनानंतर अॅन्सी आणि अंजना यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. एर्नाकुलमच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “प्रथमदर्शनी हा एक अपघात असल्याचे दिसते आहे, आम्हाला कोणत्याही घातपाताचा संशय नाही. अॅन्सी कबीरच्या नातेवाईकांनी सांगितले की, अपघाताच्या एक तास आधी तिने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट ठेवली होती, “जाण्याची वेळ आली आहे (Time to go)”

पाहा पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Ansi Kabeer (@ansi_kabeer)

कसा झाला अपघात?

31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री व्हिटिला-पलारीवट्टम महामार्गाच्या बायपासवर झालेल्या कार अपघातात दोघींनाही प्राण गमवावे लागले. एका दुचाकीला धडक दिल्यानंतर अॅन्सी आणि अंजना प्रवास करत असलेल्या कारचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात झाला, तो जखमी अवस्थेत घटनास्थळावरुन पळून गेला.

कोण होत्या दोघी?

24 वर्षीय अॅन्सी कबीर थिरुवनंतपुरम, तर 25 वर्षीय अंजना शाजन ही त्रिशूर येथील रहिवासी होती. दोघी आपल्या मूळ गावांमधून मॉडेलिंग फोटो शूटसाठी कोची येथे आल्या होत्या. 2019 या वर्षी ‘मिस केरळ’ या सौंदर्य स्पर्धेत अॅन्सी कबीर विजेती, तर अंजना शाजन उपविजेती ठरली होती.

संबंधित बातम्या :

मुंबईत दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, तीन वर्षांच्या बालकासह पाच जण जखमी

VIDEO : उल्हासनगरात 10 ते 15 गाड्यांची तोडफोड, घटनेने परिसरात खळबळ

घरासमोर जाऊन चौघांनी वाद घातला, 33 वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.