ऊसाच्या ट्रॅक्टरला फॉर्च्यून धडकली; एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार

इंदापूर येथे अत्यंत दुर्देवी अपघात झाला आहे. (Fortuner car accident in pune, three dead)

ऊसाच्या ट्रॅक्टरला फॉर्च्यून धडकली; एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 12:27 PM

पुणे: इंदापूर येथे अत्यंत दुर्देवी अपघात झाला आहे. ऊसाच्या ट्रॅक्टरला फॉर्च्यून गाडी धडकल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांनाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत. (Fortuner car accident in pune, three dead)

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर नजीक डाळज नंबर-3 येथे हा भीषण अपघात झाला. काल रविवारी रात्री हा अपघात झाला. उसाच्या ट्रॅक्टरला फॉर्च्यून गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत पावलेल्यांची नावे गीता अरुण माने, मुकुंद अरुण माने, अरुण बाबुराव माने अशी आहेत. अपघातात ठार झालेल्यांमध्ये आई, वडील आणि मुलांचा समावेश आहे. अपघातात दोन जण जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील मृतदेह काढण्यासाठी क्रेनच्या मदत घ्यावी लागली.

क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढली

रात्रीची वेळ असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्यून गाडीला ऊसाची गाडी दिसली नाही. त्यामुळे या गाडीने थेट ऊसाच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे फॉर्च्यून गाडीचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. अपघात अत्यंत भीषण होता. फॉर्च्यूनचा पुढचा भाग अक्षरश: खिळखिळा झाला आहे. ऊसाच्या गाडीला जोरदार धडक बसल्याने फॉर्च्यूनमध्ये बसलेल्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात अत्यंत भीषण असल्याने आणि फॉर्च्यून ऊसाच्या गाडीत रुतून बसल्याने गाडीतील प्रवाशांना बाहेर काढणं कठिण जात होतं. त्यामुळे पोलिसांना क्रेन मागवून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यात बराच वेळ गेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातामुळे हळहळ व्यक्क केली जात आहे. (Fortuner car accident in pune, three dead)

संबंधित बातम्या:

नागपूर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दगडाने ठेचून हत्या

गोवर्धन पर्वतावरचे दगड ऑनलाईन विकतेय ही ई-कॉमर्स कंपनी; सीईओसह तिघांना अटक

मुलीकडे एकटक बघणाऱ्या रोडरोमियोला सहा महिन्यांची सक्तमजुरी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.