नोएडातल्या भीषण अपघातात बारामतीचे चौघे मृत्यूमुखी, सुनेत्रा पवारांच्या पीएच्या आईचाही समावेश, सुप्रीया सुळेंचं थेट योगींना मदतीचं साकडं
बस आणि बोलेरो गाडीतून महाराष्ट्रातील एकूण 50 प्रवासी चारधाम यात्रेला चालले होते. यापैकी बोलेरो गाडीत सात जण प्रवास करीत होते. काल रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी नोएडा नजीक जेवर या गावाजवळ डंपरला बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समजते.
बारामती : चारधाम (Chardham) यात्रेसाठी निघालेल्या बारामती येथील भाविकांवर नोएडात काळाने घाला घातला. या भाविकांच्या बोलेरो गाडीचा गुरुवारी पहाटे नोएडाजवळ अपघात (Accident) झाला. या अपघातात बारामतीतील 4, तर कर्नाटक येथील एका महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बारामतीवर शोककळा पसरली आहे. आज पहाटे साडे पाचच्या दरम्यान हा गंभीर अपघात झाला. चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे, रंजना भरत पवार आणि मालन विश्वनाथ कुंभार अशी मयतचौघा जणांची नावे आहेत. रंजना पवार या उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे खासगी स्वीय सहायक सचिन पवार यांच्या मातोश्री आहेत. याशिवाय स्वयंपाक करणाऱ्या निवंतण मुजावर (रा.चिकोडी, कर्नाटक) या महिलेचा मृत्यु झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विटद्वारे अपघातग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली आहे.
नोएडा येथे बोलेरो गाडीच्या अपघातात बारामतीच्या चार जणांचा मृत्यू झाला.ही घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेत मरण पावलेल्या बोराडे, पवार आणि कुंभार कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
हे सुद्धा वाचा— Supriya Sule (@supriya_sule) May 12, 2022
महाराष्ट्रातील 50 प्रवासी चारधाम यात्रेला चालले होते
बस आणि बोलेरो गाडीतून महाराष्ट्रातील एकूण 50 प्रवासी चारधाम यात्रेला चालले होते. यापैकी बोलेरो गाडीत सात जण प्रवास करीत होते. काल रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी नोएडा नजीक जेवर या गावाजवळ डंपरला बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समजते. यात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून यापैकी चौघे जण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीचे आहेत.
या घटनेत मृत्युमुखी पडलेले चंद्रकांत बोराडे, सुवर्णा बोराडे, रंजना पवार आणि मालन कुंभार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे आणायचे आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) May 12, 2022
तरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ जी आपणास नम्र विनंती आहे की कृपया, आपण याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून संबंधित यंत्रणेला आवश्यक ते आदेश देण्याबाबत सकारात्मक विचार करावा. @myogiadityanath
— Supriya Sule (@supriya_sule) May 12, 2022
तसेच सुनीता राजु गस्ते(बेलगाव,कर्नाटक ) या जखमी झाल्या आहेत. अपघातग्रस्त गाडीचे चाालक नारायण कोळेकर(रा.फलटण) हे देखील गंभीर जखमी आहेत. गाडीमधील आणखी दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. तसेच अपघातग्रस्तांना मदतीसाठी दिल्लीमध्ये यंत्रणेबरोबर पवार यांनी स्वत: संपर्क साधला आहे.