Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू , थांबलेल्या ट्रकवर कार धडकली

सोलापूरमध्ये भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाझार समितीच्या परिसरात हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू , थांबलेल्या ट्रकवर कार धडकली
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 5:46 PM

सोलापूर : सोलापूरमध्ये भीषण अपघातात (Solapur Accident) 5 जणांचा (Accident Death) मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाझार समितीच्या परिसरात हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर ही घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. महामार्गावर थांबलेल्या ट्रकला कारने (Car Accident) पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.अपघात शहरानजीक असे भीषण अपघात वाढल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते, महाराष्ट्र आणि आध्र तेलंगणाला जोडाणारा हा मार्ग असल्याने या महामार्गावर मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते.

अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो

कार ट्रकवर जाऊन आदळली

दुपारच्या वेळी हल्ली कडाक्याचे उन असल्याने ट्रक चालक हे उन्हाचे ट्रक चालवणे टाळतात आणि ट्रक बाजुला लावून आराप करतात. मात्र इतर वाहचालकांना कधी कधी अति घाई नडते आणि अशी विपरित घटना घडतले. असाच प्रकार सोलापुरात घडल्याचे दिसून आले आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला कार चालकाल वेग न आवरता आल्याने कार जाऊन आदळली आहे. त्यामुळे हा भयाणक प्रकार घडला आहे. या घटनेने या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वेळीच वेगावर नियंण मिळवणे गरजेचे असते.

क्रेनद्वारे चारचाकी बाहेर काढली

ही कार पुण्याहून हुबळीला जात होती आणि त्याच कारला हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची भीषणता एवढी भयंकर होती की क्रेनद्वारे चारचाकी बाहेर काढावी लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती समोर येताच सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघाताची माहिती घेऊन तपासाला सुरूवात केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात आणखी काही माहिती समोर येते का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र अशा महामार्गावर वाहनं ही अत्यंत भरधाव वेगाने धावत असतात. अशा वेळी जराशी चुकही जीवावर बेतू शकते. त्यामुळे नेहमी सावधानता बाळगणे गरजेचे असेत. कारण वेळ वाचवण्याच्या नादात जीव जाऊ शकतो.

Dombivali Crime : डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, प्रेमसंबंधातून स्पोर्ट्स कोचकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल

नाशिकमध्ये कारसाठी विवाहितेचा छळ; मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, पती सैन्य दलात

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....