Gadchiroli | ‘तो’ रेकी करायला आला, पोलिसांना खबर, अखेर 16 लाखांचं बक्षीस असलेला खतरनाक नक्षलवाद्याला बेड्या

गडचिरोली पोलिसांनी एका खतरनाक जहाल नक्षलवाद्याला बेड्या ठोकल्या आहेत. या नक्षलवाद्यावर 16 लाखांचे बक्षीस होते. तो रेकी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली.

Gadchiroli | 'तो' रेकी करायला आला, पोलिसांना खबर, अखेर 16 लाखांचं बक्षीस असलेला खतरनाक नक्षलवाद्याला बेड्या
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 5:10 PM

गडचिरोली | 14 ऑक्टोबर 2023 : गडचिरोली पोलिसांनी एक खतरनाक जहाल नक्षलवाद्याला अटक केलीय. या नक्षलवाद्यावर 16 लाखांचे बक्षीस होते. चैनुराम वत्ते कोरसा असं नक्षलवाद्याचं नाव आहे. तो 48 वर्षांचा आहे. हा नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील टेकामेटा गावचा रहिवासी आहे. चैनुराम सध्या डिव्हीसीएम पदावर कार्यरत आहे. चैनूराम 2000 मध्ये पर्लकोटा दलममध्ये सामील झाला होता. त्याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. चैनुराम याच्यावर सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते आणि इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे देशविघातक कृत्य प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

छत्तीसगड राज्यालगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी आणि पेंढरी पोलीस ठाण्याची रेकी करण्यासाठी चैनूराम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. चैनुराम नारायणपूर (छत्तीसगड) हा गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागातील कांकेर (छ.ग.) सीमेलगत असलेल्या पोस्टे जारावंडी आणि पोस्टे पेंढरी या दोन्ही पोस्टेची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सी सिकस्टी नक्षल विरोधी पोलीस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

नक्षलवाद्यावर 2016 पासून मोठ्या जबाबदाऱ्या

चैनुराम वत्ते कोरसा याच्यावर अबुजमाड परिसरातील सर्वच नक्षल दलमला स्फोटके आणि इतर साहित्य पोहोचविण्याची जबाबदारी होती. तो सध्या नक्षलवाद्यांचा साहित्य पुरवठा उपकमांडर या पदावर होता. चैनुराम सध्या डिव्हीसीएम पदावर कार्यरत आहे. चैनुराम 2000 साली पर्लकोटा दलममध्ये सामील झाला होता. त्याच्यावर 2016 पासून मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

चैनुराम याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. तर सरकारने त्याच्यावर 16 लाखांचे बक्षीस ठेवले होते. छत्तीसगड राज्यालगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी आणि पेंढरी पोलीस ठाण्याची रेकी करण्यासाठी चैनूराम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष अभियान पथकाने त्याला ताब्यात घेतले. 2023 साली हिकेर येथे झालेल्या चकमकीचा तो प्रमुख सूत्रधार होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.