Kishan Bharwad Murder Case | किशनच्या हत्येप्रकरणी मौलाना कमर गनी उस्मानीला अटक! गुजरात ATSची दिल्लीत कारवाई
गुजरातमध्ये सध्या किशन भरवाड हत्याप्रकरणी कारवाईला वेग आलाय. याप्रकरणी एटीएसनं महत्त्वपूर्ण तपास करत अखेर संशयित आरोपी मौलाना कमर गनी उस्मानी याला दिल्लीतून अटक केली आहे.
गुजरातमध्ये सध्या किशन भरवाड हत्याप्रकरणी (Kishan Bharwad Murder Case) कारवाईला वेग आला असून आता याप्रकरणी एटीएसनं महत्त्वपूर्ण तपास करत अखेर संशयित आरोपी मौलाना कमर गनी उस्मानी याला दिल्लीतून अटक केली आहे. मोलानानं किशनची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना हत्या करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आणि हत्या करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुजरातच्या अहमदाबाद (Ahamadabad, Gujrat) जिल्ह्याच्या धंधुका भागात वादग्रस्त पोस्ट (Controversial Post on Social Media) केल्याप्रकरणी दोघांनी 27 वर्षांच्या किशन भरवाड नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येनं परिसरात एकच तणाव पाहायला मिळाला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना आधीच अटक केली होती. शब्बीर आणि इम्तियाज यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय आता मौलवी अय्यूब लाही अहमदाबादमधून अटक करण्यात आली होती. मौलवी अय्यूबने शब्बीरला हत्यार पुरवल्याचा आरोप आहे. अय्युबचे संबंध मौलाना कमर गनीसोबत असल्याचंही समोर आलं आहे.
क्राईम सीनचं रिक्रीएशन
किशनची हत्या दोघांनी मिळून हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी शनिवारी क्राईन सीन रिक्रीएट केला होता. ज्या ठिकाणाहून पोलिसांनी ज्या शस्त्रानं हत्या करण्यात आली ती बंदूक आणि बाईकही जप्त केली आहे. या सगळ्यातच गुजरात एटीएसनं रविवारी दिल्ली जाऊन या हत्येप्रकरणी मौलाना कमर गनी याला अटक केली आहे. उस्मानी वर किशनची मारेकऱ्यांना हत्येसाठी प्रोत्साहित करण्याच आरोप करण्यात आला आहे. किशनाच मारेकरी असलेल्या शब्बीरनं मौलाना कमर गनी उस्मानीला संपर्क केला होता. मौलाना कमर गनीचं भाषण ऐकल्यानंतर त्यानं हा संपर्क केला असल्याचंही कळतंय. कमर गनी उस्मानी हा तहरीफ फरोग-ए-इस्लामशी संबंधित असून त्याला त्रिपुरा दंगलीप्रकरणातही अटक करण्यात आली होती.
Gujarat ATS arrested Maulana Qamar Gani Usmani from Delhi in connection with the Kishan Bharwad Murder case: Imtiaz Sheikh, SP, ATS Gujarat pic.twitter.com/RU0CMK73cE
— ANI (@ANI) January 30, 2022
काय आहे संपूर्ण प्रकरण?
6 जानेवारीला किशन भारवाडनं फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यानंतर मुस्लिम समाजातील काही बांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी काहींनी पोलिसात या फेसबुक पोस्टबाबत तक्रारही दाखल केली होती. 25 जानेवारीला दोघांनी बाईकवर येत शब्बीर आणि इम्तियाज यांनी गोळ्या घालून किशनची हत्या केली होती. यानंतर चौकशीदरम्यान, मारेकऱ्यांची मुंबईत कमर गनीसोबत भेट झाली असल्याचंही समोर आलं होतं. किशनच्या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास लगेचच गुजरात एटीएसकडे सोपवण्यात आला होता. आता सध्या याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची चौकशी सुरु असून त्यातून काय अधिक माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचंय.
संबंधित बातम्या :
‘माझ्या नादी लागाल, तर करीन 302’ म्हणणारी अखेर अटकेत! सोशल मीडियावरची गुंडगिरी भोवली
पिंपरी चिंचवडमधील तरुणाला मारहाण प्रकरण; पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपींची धिंड