पतीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पत्नीने बळजबरी तरुणीचे केस कापले

काही महिलांनी एका युवतीला धरले आहे, तर एक महिला बळजबरी तिचे केस कापत आहे, असे व्हिडीओमध्ये दिसते. तरुणीने आरडाओरड करुन स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला.

पतीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पत्नीने बळजबरी तरुणीचे केस कापले
सुरतमध्ये महिलेने तरुणीचे केस कापले
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 12:48 PM

सुरत : पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने तरुणीचे केस कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरात राज्यातील सुरतमध्ये गावकऱ्यांच्या समोरच महिलेने तरुणीच्या केसांना जबरदस्ती कात्री लावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

काही महिलांनी एका युवतीला धरले आहे, तर एक महिला बळजबरी तिचे केस कापत आहे, असे व्हिडीओमध्ये दिसते. तरुणीने आरडाओरड करुन स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उलट काही महिलांनी तिचे केस कापण्यातच पुढाकार घेतला, तर काही जणांनी केवळ बघ्याची भूमिका घेणंच पसंत केलं.

गावकऱ्यांची बघ्याची भूमिका

सुरतमधील पलसाना तालुक्यातील तातीथईया गावातील हा व्हायरल व्हिडीओ असल्याचं बोललं जातं. संबंधित तरुणी आरडाओरड करुन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र त्यावेळी काही जण पोट धरुन खो-खो हसत सुटले होते. काही जणांनी तर या घटनेचा व्हिडीओ काढण्यात धन्यता मानली.

पत्नी आणि युवतीत आधीही खटके

पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेशिवाय दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सुरत ग्रामीण भागाच्या एसपी उषा राडा यांनी सांगितलं की आपल्या पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय होता. यावरुन दोघींमध्ये आधीही भांडण झालं होतं. त्यानंतर तरुणी मध्य प्रदेशातील आपल्या घरी निघून गेली होती. काही दिवसांपूर्वी ती कडोदराला परतल्याचं पत्नीला समजलं. त्यामुळे दोघींमध्ये पुन्हा खटके उडाले. बाचाबाचीनंतर आरोपी महिला सेकन्तीसह तिच्या दोन मैत्रिणींनी तरुणीला धरलं. त्यानंतर तिचे केस कात्रीने कचाकचा कापले.

पुण्यात पतीने पत्नीचे केस कापले

याआधी, पिंपरी परिसरातही विकृतीचा कळस गाठणारी घटना समोर आली होती. पती दारुसाठी वारंवार मारहाण करत असल्याच्या कारणाने पत्नी नांदायला येण्यास तयार नव्हती. त्यामुळे पतीने पत्नीला मारहाण करुन, तिला विद्रुप करण्याच्या उद्देशाने तिचे केस कापले. पुण्यात पिंपरी चिंचवड भागात दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली होती. आरोपी पतीविरोधात पोलिसात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला.

संबंधित बातम्या :

प्रियकराच्या लग्नामुळे प्रेयसीचा संताप, नववधूचे केस कापले, डोळ्यात फेविक्वीक ओतलं

नांदायला नकार देणाऱ्या पत्नीचे लांबसडक केस पतीने कापले, पिंपरीमध्ये विकृतीचा कळस

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.