वडिलांवरील आंधळ्या विश्वासामुळे घात, बारा वर्षांच्या मुलासमोर आई-आजीसह तिघांची निर्घृण हत्या

लग्न झाल्यापासूनच आरोपी नीरज पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरुन दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. गेल्या एक वर्षापासून आयेशा तिच्या माहेरी राहू लागली. त्यांचा 12 वर्षांचा मुलगाही आईसोबत राहू लागला. त्यामुळे नीरज चावला देखील यामुळे चिडला होता.

वडिलांवरील आंधळ्या विश्वासामुळे घात, बारा वर्षांच्या मुलासमोर आई-आजीसह तिघांची निर्घृण हत्या
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 3:02 PM

चंदिगढ : पत्नी, सासू, मेहुणा आणि त्याच्या मित्रावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना हरियाणा राज्यातील फरीदाबाद जिल्ह्यातील धौज पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवार पहाटे उघडकीस आली आहे. आरोपी पतीने मित्राच्या साथीने केलेल्या गोळीबारात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला, तर मेहुणा जखमी झाला आहे.

आरोपीच्या मेव्हण्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेली हत्यारे, चाकू आणि मोटारसायकलही जप्त केल्या आहेत. तिहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेल्या नीरज याला पत्नी आयेशाच्या चारित्र्यावर संशय होता. नीरजचा मेहुणा गगनसोबत 10 लाख रुपयांच्या व्यवहारावरुन असलेला वादही हत्येस कारणीभूत असल्याचं बोललं जातं.

गगनच्या फिर्यादीवरून पोलिसांनी धौज पोलिस ठाण्यात हत्या, खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तिहेरी हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या जखमी गगनने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

काय आहे प्रकरण?

हे कुटुंब मूळचे हरियाणा राज्यातील पानिपत येथील समलखा भागातील आहे. फरिदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गगनने सांगितले की, त्याच्या कुटुंबाने 13-14 वर्षांपूर्वी एनआयटी-ए मधील रहिवासी नीरज चावलाशी बहीण आयेशाचा विवाह लावून दिला होता.

लग्न झाल्यापासूनच आरोपी नीरज पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरुन दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. गेल्या एक वर्षापासून आयेशा तिच्या माहेरी राहू लागली. त्यांचा 12 वर्षांचा मुलगाही आईसोबत राहू लागला. त्यामुळे नीरज चावला देखील यामुळे चिडला होता.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या फरिदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयेशा आणि तिची आई सुमन गुरुवारी रात्री जेवल्यानंतर खालच्या खोलीत झोपायला गेल्या. आयेशाचा भाऊ गगन आणि त्याचा मित्र राजन आणि 12 वर्षांचा भाचा (आयेशाचा मुलगा) वरच्या खोलीत झोपायला गेले.

नेमकं काय घडलं?

गुरुवार-शुक्रवारच्या दरम्यान मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गगनला घरात गोळीबाराचा आवाज आला. गगनने पाहिले की त्याचा मेव्हणा नीरज चावला आणि त्याच्यासोबत आलेला मित्र लेखराज, हे त्याचा मित्र राजनला गोळी मारत होते. मात्र दोघा सशस्त्र आरोपींची गगनवर नजर पडताच तो जीव वाचवण्यासाठी पळून गेला. त्याचवेळी हल्लेखोरांनी मागून गगनच्या कमरेला गोळी झाडली. यानंतर नीरज चावला आणि मित्र लेखराज यांनी आधी आयेशा आणि तिची आई सुमन यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर दोघांनाही चाकूने त्यांच्या पोटावर वार केले.

वडिलांवरील आंधळ्या विश्वासामुळे घात

फरिदाबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सासुरवाडीला पोहोचलेल्या नीरज चावलाने घरात झोपलेल्या आपल्या 12 वर्षांच्या मुलालाही मोबाईलवर कॉल केला होता. नीरजने मुलाला सांगितले की तो घराच्या दारात उभा आहे आणि त्याला भेटायला आला आहे. मध्यरात्री दोन वाजता येण्याचे कारण मुलाने विचारले असता नीरजने प्रश्न टोलवला आणि मी तुला भेटून लगेच निघून जाईन, असं सांगितलं. वडिलांच्या डोक्यात शिजणाऱ्या रक्तरंजित षडयंत्रापासून अनभिज्ञ असलेल्या 12 वर्षांच्या मुलाने दरवाजा उघडला आणि वडिलांना घरात बोलावले.

घरात प्रवेश करताच आरोपी प्रथम घराच्या पहिल्या मजल्यावर पोहोचले. तिथे नीरज चावलाचा मेहुणा गगन आणि त्याचा मित्र राजन झोपले होते. राजन आणि गगन यांना दोघांनी आधी गोळ्या घातल्या. त्यानंतर दोघेही तळ मजल्यावर पोहोचले. तिथे त्यांनी आयेशा आणि तिच्या आईवर गोळ्या झाडल्या. यावेळी बारा वर्षांच्या मुलाने मृत्यूचा तांडव डोळ्यासमोर घडत असताना कसंबसं कोपऱ्यात लपून आपला जीव वाचवला.

संबंधित बातम्या :

दहा दिवस पोलिसांना गुंगारा, पोटच्या पोरीला टाकीत बुडवून मारणारी आई Google मुळे कशी सापडली?

आई-वडिलांच्या भांडणात मध्यस्थी, बापाकडून मानेवर कोयत्याने वार, बारामतीत तरुणाचा मृत्यू

जीम मालकाचा माज, फर्निचर बनवणाऱ्या मजुरांना उपाशीपोटी 24 तास डांबलं, अत्याचाराला वैतागलेल्या कंत्राटदाराचा जीममध्ये गळफास

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.