संतापजनक… अल्पवयीन मुलीसमोर रिक्षाचालकाचं हस्तमैथून, हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अल्पवयीन मुलीसमोर एका रिक्षाचालकाने हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. सचिन शेंडगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

संतापजनक... अल्पवयीन मुलीसमोर रिक्षाचालकाचं हस्तमैथून, हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 7:10 PM

पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलीसमोर एका रिक्षाचालकाने (Rikshaw Driver) हस्तमैथून केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडलाय. सचिन शेंडगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजता 12 वर्षीय मुलगी क्लासवरुन घरी जात असताना रिक्षाचालक विरुद्ध दिशेनं आला. पत्ता विचारण्याचा बहाणा करुन आरोपीने मुलीसमोर हस्तमैथून केलं. या घटनेमुळं मुलगी घाबरली. तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिंजवडी पोलिसांकडे (Hinjewadi Police) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन आरोपी रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

बावधनमध्ये रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

साधारण आठवडाभरापूर्वीच पुण्यातील बावधन परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. बावधन परिसरात एका रिक्षाचालकाने शुक्रवारी एका 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. पीडितेच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. ही मुलगी एका खासगी अभ्यासाच्या शिकवणीहून परतत असताना रिक्षाचालकाने हा संतापजनक प्रकार केला. मुलगी स्टडी रूममधून बाहेर पडून दुपारी 3.10च्या सुमारास बावधन येथील एलएमडी चौकात आली, तेव्हा एक रिक्षाचालक पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्याजवळ आला आणि नंतर तिचा विनयभंग केला, अशी माहिती पोलिसांनी दिलेल्या निवेदनात दिली आहे. घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत जाऊन यासंबंधीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

2021 मध्येही पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार

यापूर्वी एप्रिल 2021 मध्येही पिंपरी चिंचवडच्या मोरेवाडी परिसरात रिक्षातून जाताना सहप्रवासी महिलेकडे पाहून एका तरुणानं हस्तमैथून केल्याचा प्रकार समोर आला होता. पीडित महिलेनं पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली होती. पिंपरीतील मोरवाडी येथून रिक्षातून वायसीएम रुग्णालयात पीडित महिला आपल्या मुलाला उपचारासाठी घेऊन जात होती. त्यावेळी तिच्याकडे बघत संबंधित तरुण हस्तमैथुन करत होता. हा घृणास्पद प्रकार समजल्यानंतर महिलेनं थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती.

इतर बातम्या :

Delhi Murder : दिल्लीत पाण्यावरुन झालेल्या भांडणातून महिलेची गळा चिरुन हत्या, पतीवरही वार

धक्कादायक… पोटच्या लेकीशी शारिरीक संबंध, नंतर नरबळी देण्याचाही प्रयत्न; नराधम बाप पोलिसांच्या जाळ्यात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.