गृहमंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या गाडीची काच फोडली, 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रं चोरीला
बाबासाहेब शिंदे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र गृह राज्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातच गृहमंत्र्यांच्या सचिवांचे पैसे चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सातारा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून पैसे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाबासाहेब शिंदे (Babasaheb Shinde) यांच्या कारमधून 50 हजार रुपयांची चोरी झाली. याशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रेही चोरीला गेल्याचा आरोप आहे. सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटणमध्ये (Phaltan) लग्न सोहळ्यासाठी गेलेले असताना हा प्रकार घडला.
बाबासाहेब शिंदे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र गृह राज्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातच गृहमंत्र्यांच्या सचिवांचे पैसे चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काय आहे प्रकरण?
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे फलटण तालुक्यातील धुळदेव येथे एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्नाहून निघाल्यावर कारकडे येत असताना गाडीची काच फोडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याच वेळी कारमधील 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रंही गहाळ झाल्याचं त्यांना समजलं.
पोलिसात तक्रार
बाबासाहेब शिंदे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली. फलटण शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभुराज शिंदे हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गृह मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या गाडीची काच फोडून पैशांची चोरी केली जाते, या प्रकारावरुन चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या :
बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या प्रेमी युगुलाला मारहाण, अकोल्यात संतापजनक प्रकार
बोरीपाडा आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; अभ्यास बुडू नये म्हणून वसतिगृहात ठेवले अन्…