चालबाज मोलकरणीने डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं, त्यानंतर जे मागितलं त्याने…; पुढे काय घडलं?

हनी ट्रॅपमध्ये अडकवून एका डॉक्टरला त्याच्याच मोलकरणीने ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मोलकरणीला तिच्या नवऱ्याचीही साथ होती. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.

चालबाज मोलकरणीने डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं, त्यानंतर जे मागितलं त्याने...; पुढे काय घडलं?
honey trap Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 2:07 PM

बूंदी : राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील एका जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका डॉक्टरला त्याच्याच मोलकणीने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल दीड वर्ष हा डॉक्टर या मोलकरणीच्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकून होता. या काळात या मोलकरणीने त्याला ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळले. एवढे पैसे देऊनही मोलकरणीचे ब्लॅकमेलिंग सुरूच होते. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार करताच या मोलकरणीचा खेळ संपला.

ही मोलकरीण डॉक्टराकडे दीड वर्षापूर्वी साफ सफाईचं काम करत होती. त्याचवेळी या महिलेने डॉक्टरकडून 30 हजार रुपये घेतले आणि त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर या महिलेने या डॉक्टरला बलात्काराच्या आरोपात अडकवण्याची धमकी दिली. तसेच आरोपातून वाचायचं असेल तर पैसे देण्याची मागणीही केली. या प्रकारात महिलेला तिचा नवराही साथ देत होता. दोघांनी मिळून या डॉक्टरची कोंडी करत त्याच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

डिमांड वाढली

हनी ट्रॅपमध्ये अडकलेला हा डॉक्टर दीड वर्षापासून या महिलेला पैसे देत होता. दीड वर्षात त्याने या मोलकरणीला 6.50 लाख रुपये दिले होते. त्यानंतर या दाम्पत्याची हाव वाढली. त्यांनी डॉक्टरकडे थेट 10 लाख रुपये मागितले. एक रकमी रक्कम देण्यास सांगितलं. त्यामुळे डॉक्टरच्या तोंडचं पाणीच पळालं. आधीच साडे सहा लाख दिले. आता अजून दहा लाख रुपये कुठून देणार? असा प्रश्न त्याला पडला.

दहा लाख दिल्यानंतरही यातून सुटका होईल याची काही शाश्वती वाटत नसल्याने अखेर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. प्रकरणाचं गांभीर्य समजून पोलिसांनी ही तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी या मोलकरणीला आणि तिच्या नवऱ्याला तात्काळ अटक केली.

पोलीस काय म्हणाले?

या महिलेने आतापर्यंत डॉक्टरकडून साडे सहा लाख रुपये उकळले आहेत. हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्यानेच या डॉक्टरने तिला एवढी मोठी रक्कम दिली. डॉक्टरच्या अकाऊंटवरून आणि कॅशने सुद्धा या महिलेने रक्कम घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दहा लाखाची मागणी केल्याने अखेर डॉक्टरने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे दोघांनाही डॉक्टरच्या निवासस्थानातून अटक केल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी सहदेव मीणा यांनी सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.