AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा सैराट ! पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने भावने केली हत्या, बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं, महाराष्ट्र हादरला

भावाने बहिणीची हत्या अतिशय अमानुषपणे केली असून यामध्ये त्याने आपल्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे केले आहे. हत्या करुन आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.

पुन्हा सैराट ! पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने भावने केली हत्या, बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं, महाराष्ट्र हादरला
boy and girl murder
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 6:52 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात एक अतिशय़ धक्कादयक असा प्रकार घडलाय. बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केलीय. ही हत्या अतिशय अमानुषपणे करण्यात आली असून यामध्ये भावाने  आपल्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे केले आहे. हत्या करुन आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.

भावाने बहिणीच्या हत्येचा कट रचला

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगाव येथील एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तिच्या भावाच्या मनात या गोष्टीचा राग होता. त्यानंतर आरोपी भावाने आपल्याच बहिणीच्या हत्येचा कट रचला. त्याने बहिणीला घरी भेटायला येण्यास गळ घातली. तसेच बहीण घरी येताच त्याने तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले.

मुंडके धडावेगळे होईपर्यंत कोयत्याने मानेवर वार

या हल्ल्यात प्रेमविवाह केलेली तरुणी गंभीर जखमी झाली. तसेच आरोपी असलेला तरुणीचा भाऊ फक्त एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे होईपर्यंत कोयत्याने मानेवर वार केले. सपासप वार केल्यामुळे तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेमुळे संपूर्ण माहाराष्ट्र हादरलाय.

महाराष्ट्र हादरला, पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान ऑनर किलिंगच्या या प्रकरामुळे औरंगाबादसह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने बहिणीचा खून करून वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलीस ठाण्याकडून करण्यात येतोय.

इतर बातम्या :

Bengal Crime: बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण

VIDEO | प्रवाशांवरुन खेचाखेची, औरंगाबादमध्ये गाडी भरण्यावरुन चालकांची फ्री-स्टाईल हाणामारी

VIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.