तिघेही बंधाऱ्यात पडले! बाबा वाचले, आई बेपत्ता, नाकातोंडात पाणी जाऊन 1 वर्षाचं बाळ तडफडून दगावलं
Family Drawn in Canal : बंधाऱ्यात बडून एक वर्षांच्या चिमुरडीचा तडफडून झालेल्या मृत्यूची कल्पनाही करवत नाही. एका वर्षांच्या बाळाची मृत्यूआधी नाका-तोंडात पाणी जाऊन झालेली तडफड अंगावर काटा आणणारी आहे.
सोलापूर : सोलापुरातून (Solapur) एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. एक अख्खच्या अख्ख कुटुंब बंधाऱ्यावरुन तोल जाऊन खाली पडलं. यात एक वर्षांचं बाळ, पती आणि पत्नीचा समावेश आहे. या दुर्घटनेमध्ये एका वर्षांच्या बाळाचा दुर्दैवी (one year old baby died) अंत झाल्यानं एकच हळहळ व्यक्त होतेय. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवर जवळ असलेल्या एका बंधाऱ्यावर ही दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या (South Solapur and Akkalkot Taluka) सीमेवरच्या सीना नदीवर असलेल्या कलकर्जाळ बंधाऱ्यावर पती पत्नी आणि त्यांची एक वर्षांची मुलगी तोल जाऊन पडली. यानंतर बंधाऱ्यात पडलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आलं. मात्र एक वर्षांची मुलगी बंधाऱ्यात पडून दगावल्याची घटना समोर आली आहे. बंधाऱ्यात बडून एक वर्षांच्या चिमुरडीचा तडफडून झालेल्या मृत्यूची कल्पनाही करवत नाही. एका वर्षांच्या बाळाची मृत्यूआधी नाका-तोंडात पाणी जाऊन झालेली तडफड अंगावर काटा आणणारी आहे.
कसा काय गेला तोल?
आनंद माळगे हा 25 वर्षांचा तरुण 20 वर्षीय पत्नी सुप्रिया माळगे आणि एक वर्षांची मुलगी संजीवनी सह बंधाऱ्यात पडले. यानंतर आनंद हा पोहत पोहत काठावार आला. मात्र यानंतर आनंदची पत्नी बेपत्ता झाली आहे. सध्या तिचा शोध सुरु आहे. दुर्दैवाची बाब म्हणते एक वर्षांची चिमुकली संजीवनी बंधाऱ्यात तोल जाऊन मृत्युमुखी पडली आहे. या घटनेमुळे एकच हळहळ परिसरात व्यक्त होतेय.
..तर कदाचित दुर्घटना टळली असती?
काही महिन्यांपूर्वी सीना नदीला पूर आला होता. या पुरात बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. त्यामुळे या बंधाऱ्याची पडझड झाली होती. या पडझडीकडे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिधींनी दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला जातो आहे. वेळीच जर पडझडीकडे दुर्लक्ष न करता त्यावर काम केलं असतं आणि बंधारा दुरुस्त केला असता, तर कदाचित शुक्रवारी घडलेली घटना टळली असती, असंही बोललं जातंय.
संबंधित बातम्या :
सोलापूर : एक नव्हे दोन नव्हे पठ्ठ्याने चोरल्या तब्बल 233 सायकल, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
दुग्धजन्य पदार्थांमधून विषबाधा; दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
पैसे दिले नाहीत म्हणून राग, आईची धारदार शस्त्राने हत्या, सोलापुरातील धक्कादायक घटना