गुगुलवर सर्च केले ‘पत्नीच्या मरण्याचे फायदे’, मग हत्या करुन शरीराचे 234 तुकडे केले

Britain Murder Case: पोलिसांना होली ब्रॅमली हिच्या हत्येची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निकोलस याच्या फ्लॅटवर पोहचले. त्या ठिकाणी अमोनिया आणि ब्लीजचा वास येत होता. बाथरुममध्ये रक्त सांडलेले होते. रुममधील कपड्यांवर रक्ताचे डाग होते.

गुगुलवर सर्च केले 'पत्नीच्या मरण्याचे फायदे', मग हत्या करुन शरीराचे 234 तुकडे केले
निकोलस मेटसन, होली ब्रॅमली
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 2:02 PM

मुंबईतील श्रद्धा वालकर हिचा नवी दिल्लीत खून झाला होता. तिचा सोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणारा आफताब अमीन पूनावाला याने तिची हत्या केली होती. तिच्या शरीराचे अनेक तुकडे करुन जंगलात फेकून दिले होते. त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती ब्रिटनमध्ये झाली आहे. खून करणाऱ्या ‘पतीने पत्नीच्या मरण्याचे फायदे’, ‘पत्नी मेल्यानंतर मला काय अडचणी येणार’, असे सर्च केले होते. ब्रिटनमधील निकोलस मेटसन याने त्याच्या पत्नीची हत्या करुन तिच्या शरीराचे 224 तुकडे केले. त्याच्या पत्नीचे नाव होली ब्रॅमली आहे. ही हत्या करण्यासाठी त्याने आपल्या मित्राची मदत घेतली होती.

बीबीसीमधील रिपोर्टनुसार, 28 वर्षीय निकोलस मेटसन याने पत्नीची हत्या केली आहे. त्याने आपला गुन्हाही कबुल केला आहे. परंतु त्याने पत्नीची हत्या का केली? यासंदर्भात अजून स्पष्टीकरण झालेले नाही. परंतु पत्नीचा मृतदेहाचा विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मित्र जोशुआ हॅनकॉक याची मदत घेतली. त्यासाठी त्याला पन्नास पाउंड दिले होते.

पोलिसांनी घेतला शोध

पोलिसांना होली ब्रॅमली हिच्या हत्येची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निकोलस याच्या फ्लॅटवर पोहचले. त्या ठिकाणी अमोनिया आणि ब्लीजचा वास येत होता. बाथरुममध्ये रक्त सांडलेले होते. रुममधील कपड्यांवर रक्ताचे डाग होते. त्यानंतर पोलिसांनी त्या रक्ताचे नमून घेतले. ते प्रयोगशाळेत पाठवले. होली हिचेच ते रक्त असल्याचे स्पष्ट झाले.

हे सुद्धा वाचा

नदीत फेकले शरीराचे तुकडे

पोलिसांशी बोलताना मेटसनने दावा केला की तो त्याच्या पत्नीच्या घरगुती अत्याचाराला बळी पडला होता. त्याने पोलिसांना पत्नीच्या चाव्याचे चिन्ह दाखवले. मात्र, पोलिसांनी मेटसनच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. त्याच्या पुन्हा एकदा फ्लॅटची झडती घेतली. यावर मॅटसनने गमतीने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी पलंगाखाली लपली आहे का, हे पहा.

पोलिसांनी फ्लॅटची तपासणी केल्यावर बैसिंघम येथील विथम नदीत तपास केला. कारण या नदीत लोकांना तरंगणाऱ्या प्लास्टिकच्या थैल्या दिसल्या. यामुळे पोलिसांनी नदीत शोध सुरु केला. त्यावेळी ब्रॅमली हिच्या शरीराचे 224 तुकडे मिळाले. पोलिसांचा दावा आहे की, अजूनही तिच्या शरीराचे काही तुकडे मिळाले नाही. मेटसन याने बाथरूममध्ये पत्नीवर अनेक चुकीने वार केले होते. त्याच ठिकाणी तिचे तुकडे करुन प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. कोल्ड स्टोरेजमध्ये ते तुकडे ठेवले. त्यानंतर हॅनकॉक याची मदत घेऊन ते नदीत फेकले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.