AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध, पत्नीला राग अनावर; आधी गोळी मारली मग शरीराचे केले तुकडे

महिलेने तिच्या पतीच्या प्रेमसंबंधाबद्दल जाणून घेण्यासाठी एका खासगी गुप्तहेराची नेमणूक केली होती. कित्येक दिवसांच्या तपासानंतर एलिसला कोणी सांगितले की तिची शंका खरी आहे. यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले आणि पती अचानक गायब झाला.

पतीचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध, पत्नीला राग अनावर; आधी गोळी मारली मग शरीराचे केले तुकडे
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 7:30 PM
Share

ब्राझिलिया : पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले प्रेमसंबंध कळल्यावर एका महिलेला तिचा संताप इतका अनावर झाला की तिने तिच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना ब्राझिल येथे घडली आहे. महिलेने प्रथम आपल्या पतीला ठार मारले, नंतर त्याच्या शरीराचे लहान लहान तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले. सुटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे घेऊन जाणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याच्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली. (Husband murdered by wife out of anger over having an affair with another woman)

सूडाच्या भावनेने बनली खूनी

‘डेली स्टार’च्या बातमीनुसार, ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एलीझ मात्सुनागा(Elize Matsunaga)ला तिचा पती मार्कोस मात्सुनागा(Marcos Matsunaga)चे दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांबद्दल माहिती मिळाली. तिच्या पतीच्या फसवणुकीमुळे, एलिसाचा संताप अनावर झाला. तिला कोणत्याही परिस्थितीत तिच्या पतीचा बदला घ्यायचा होता आणि या इच्छेत ती खुनी बनली. तिने घरीच ही हत्या केली.

सावत्र वडिलांनीही महिलेचा केला होता छळ

एलिस मत्सुनागाचे बालपणही खूप वाईट होते. तिच्या सावत्र वडिलांच्या अत्याचाराला कंटाळून तिने घर सोडले आणि कॉलेजची फी भरण्यासाठी शरीराचा सौदे करण्यास सुरुवात केली. या काळात तिची भेट जपानी व्यापारी मार्कोस मत्सुनागा यांच्याशी झाली. एलिसासोबत लग्न करण्यासाठी मार्कोसने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. दोघांनाही एक मूल आहे.

खाजगी गुप्तहेरही नेमला होता

महिलेने तिच्या पतीच्या प्रेमसंबंधाबद्दल जाणून घेण्यासाठी एका खासगी गुप्तहेराची नेमणूक केली होती. कित्येक दिवसांच्या तपासानंतर एलिसला कोणी सांगितले की तिची शंका खरी आहे. यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले आणि पती अचानक गायब झाला. मार्कोस मत्सुनागा शेवटचा पिझ्झा घेताना दिसला होता. आरोपी पत्नीने पोलिसांना सांगितले की भांडण इतके वाढले की तिचा राग अनावर झाला. तिने घरात ठेवलेले पिस्तूल काढून तिच्या पतीवर गोळ्या झाडल्या.

तीन सूटकेसमध्ये नेण्यात आला मृतदेह

पतीची हत्या केल्यानंतर, एलिस मत्सुनागा हिने प्रथम मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शरीराचे सात तुकडे केले. मग तिने मृतदेहाचे तुकडे तीन सुटकेसमध्ये भरले आणि विल्हेवाट लावली. आरोपी तीन सुटकेससह सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, या आधारावर पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले. एलिसने न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला होता. पतीच्या हत्येप्रकरणी तिला 19 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. (Husband murdered by wife out of anger over having an affair with another woman)

इतर बातम्या

अफगाणिस्तान : कंदहारच्या शिया मशिदीत 3 साखळी स्फोट, हल्ल्यात 32 जण ठार झाल्याची माहिती

धक्कादायक ! चवदार सांभार बनवले नाही म्हणून तरुणाकडून आई आणि बहिणीची हत्या

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.