पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याचं स्वप्न पडलं अन् संशयी पतीने पत्नीलाच भोसकलं; ऐकावं ते भयंकरच

पतीने अचानक वार केल्याने पत्नी घाबरली. तिने जोरजोरात आरडाओरडा केला. त्यामुळे तिच्या घरातील लोक धावत आले आणि त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. दुसरीकडे पत्नीच्या किंकाळ्या ऐकून संशयी पतीने तिथून धूम ठोकली.

पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याचं स्वप्न पडलं अन् संशयी पतीने पत्नीलाच भोसकलं; ऐकावं ते भयंकरच
चहा पिताच चौघांचा मृत्यूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 3:15 PM

नवी दिल्ली: जगात कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. क्राईमच्या दुनियेत तर रोज काही ना काही चित्रविचित्रं घटना घडत असतात. त्यात जर एखादी व्यक्ती संशयी असेल तर मग बघायलाच नको. अशीच एक घटना घडली आहे. एका संशयी नवऱ्याला (husband) त्याच्या पत्नीचे (wife) परपुरुषाशी संबंध असल्याचे स्वप्न पडले. या पठ्ठ्याने स्वप्नालाच वास्तव मानले आणि थेट पत्नीवरच हल्ला केला. पत्नीला चाकूने (stabs) भोसकले. तिच्यावर वार केले. त्यामुळे त्याची पत्नी रक्तबंबाळ झाली. ती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्यातची कसून चौकशी सुरू आहे.

ही घटना घडलीय ब्राझिलच्या प्लॅनाल्टिना शहरातील. 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. या व्यक्तिला 9 ऑगस्ट रोजी स्वप्न पडलं होतं. पत्नीचं एका व्यक्तीबरोबर संबंध असल्याचं त्याने स्वप्नात पाहिलं. आपली पत्नी आपल्याशिवाय दुसऱ्याचा विचार करूच कसा शकते? असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. हे स्वप्न पाहिल्यानंतर तो लालेलाल झाला आणि त्याने आपला राग पत्नीवर काढला.

पत्नीचं दुसऱ्या पुरुषाशी खरोखरच संबंध आहेत का? हे कन्फर्म करण्यासाठी त्याने आपलं स्वप्न पत्नीला सांगून तिला त्या व्यक्तीबद्दल विचारणा केली. त्यामुळे पत्नी आणि त्याच्यात वादावादी होऊन कडाक्याचं भांडण झालं. बराच वेळ दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. स्वप्न आणि वास्तव यात फरक आहे. स्वप्नात जे दिसतं ते वास्तव असतच असं नाही, असं तिने पतीला सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण पतीचा त्यावर विश्वासच बसेना. त्याने तिच्या मागे तगादाच लावला.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर तो झोपी गेला. थोड्यावेळाने पुन्हा उठला आणि त्याने पत्नीशी पुन्हा भांडण उकरून काढलं. यावेळी त्याचा पारा अधिकच चढला होता. या रागाच्या भरात त्याने पत्नीला चाकूने भोसकले. तिच्या हातावर आणि गळ्यावरही वार केले. त्यामुळे ती रक्तबंबाळ झाली.

पतीने अचानक वार केल्याने पत्नी घाबरली. तिने जोरजोरात आरडाओरडा केला. त्यामुळे तिच्या घरातील लोक धावत आले आणि त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. दुसरीकडे पत्नीच्या किंकाळ्या ऐकून संशयी पतीने तिथून धूम ठोकली.

दरम्यान, पोलिसांनी पाच हप्त्यानंतर या 37 वर्षीय पतीला अटक केली आहे. या आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला आहे. तसेच त्याच्या विरोधात या आधीही अनेक गुन्हे असल्याचं सांगितलं जात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.