AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wife Swapping Racket | ‘तुम्ही दोघं आधी टेलिग्राम ग्रूपमध्ये ऍड व्हा, मग स्वॅपिंगसाठी…’ पोलिसांनी सांगितली मोड्स ओपरेंडी

Kerala Wife Swapping Racket | एका पीडित महिलेनं या प्रकरणी सगळ्यात आधी आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रा दिली होता. आपल्या पतीनं अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यासाठी आपला छळ लावला असल्याचं या पीडित महिलेचं म्हणणं होतं. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यातूनच पोलिसांनी कलप शेअरींग ग्रूपबाबत माहिती मिळाली.

Wife Swapping Racket | 'तुम्ही दोघं आधी टेलिग्राम ग्रूपमध्ये ऍड व्हा, मग स्वॅपिंगसाठी...' पोलिसांनी सांगितली मोड्स ओपरेंडी
केरळ वाईफ स्वॅपिंग प्रकरणात कारवाई
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 7:24 PM
Share

तिरुअनंतपुरम : केरळमधील धक्कादायक प्रकारानं पोलिसांचीही झोप उडवली आहे. बायकांची अदलाबदल करण्याच्या भयंकर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. तर 25 जणांवर पोलीस बारीक नजर ठेवून आहेत. अशातच याप्रकरणी येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र याप्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब पोलिसांनी समजली आहे. बायकांची अदलाबदल करणारं हे रॅकेट (Wife Swapping) नेमकं काम कसं करत होतं, याचीही माहिती पोलिसांनी लागली आहे. या रॅकेटमध्ये तब्बल एक हजार दाम्पत्य असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका सोशल नेटवर्कींग ग्रूपच्या (Social Networking Group) माध्यमातून हे वाईफ स्वॅपिंग रॅकेट (Kerala Husband Wife Exchange Racket) काम करत होतं. यात तब्बल एक हजार कपल होते, जे आपल्या बायकांची अदलाबदल करुन त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवयाचे, अशीही खळबळजनक माहिती समोर आली आहे. या रॅकेट मोड्स ऑपरेंडी काय होती, हे देखील पोलिसांनी उघड केलंय. एखाद्या सिनेमाला लाजवेल, इतका थरारक हा प्रकार असून याप्रकरणी कमालीची गुप्तता पोलिसांनी कारवाई करताना बाळगली होती.

काय होती मोड्स ओपरेंडी?

एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं IANS या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटलंय, की बायकांची अदलाबदल करण्याच्या या धक्कादायक रॅकेटमध्ये सुरुवातील टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रूपमध्ये लोक आदी ऍड व्हायची. त्यानंतर दोन किंवा तीन कपल एकमेकांना भेटायची. त्यानंतर बायकांची अदलाबदल केली जायची. कधी कधी तर एकाच महिलेशी तीन पुरुष संबंध ठेवत असल्याचंही तपासातून समोर आलंय. काही जण तर बायकोशी शरीर संबंध करु देण्याचे पैसेही घेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असून अनैसर्गिकपणे शरीर संबंध ठेवण्यासही बायकांना भाग पाडलं जात असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, याप्रकऱणी आता सखोल चौकशी आणि तपासकार्य पोलिस करत आहेत. आता ज्या टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रूपमधूल या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे, त्यांचे संबंध इतर कोणत्या ग्रूपशी आहेत का, याचा शोध घेतला जातो आहे. दरम्यान, 2019 सालीदेखील असंच एक प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी सोशल नेटवर्कींग ऍप शेअर चॅटचा वापर करुन काहींनी गैरप्रकार केल्याचं समोर आलं होतं.

प्रकरण उघडकीस कसं आलं?

एका पीडित महिलेनं या प्रकरणी सगळ्यात आधी आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रा दिली होता. आपल्या पतीनं अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यासाठी आपला छळ लावला असल्याचं या पीडित महिलेचं म्हणणं होतं. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यातूनच पोलिसांनी कलप शेअरींग ग्रूपबाबत माहिती मिळाली. दरम्यान, यानंतर केलेल्या शोधातून जो प्रकार पोलिसांच्या समोर आला, तो अत्यंत धक्कादायक आणि हादरवणारा असा होता. केरळच्या कोट्टायम इथलं हे सगळं प्रकरण असून याप्रकरणी आता आणखी जणांना बेड्या पडण्याची शक्यता आहे. काही प्रतिष्ठित कुटुंबातील लोकही यामध्ये असल्याचा पोलिसांनी संशय असून त्या अनुषंगानं तपासही सुरु आहे.

संबंधित बातम्या –

नर्ससोबत बळजबरी शरीरसंबंध, गरोदर राहिल्याने गर्भपात, औरंगाबादेत 25 वर्षीय डॉक्टरसह चौघांवर गुन्हा

Wife Swapping Racket | परपुरुषांशी लैंगिक संबंधांसाठी हजारोंचा पत्नीवर दबाव

गर्लफ्रेण्डचीही ‘गर्लफ्रेण्ड’ निघाली, बॉयफ्रेण्ड चवताळला, समलिंगी संबंधातून 29 वर्षीय तरुणीची हत्या

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.