चोरट्यांचा दिवाळीबारः नाशिकमध्ये घरफोडी करून मोत्याचा हार, सोन्या-चांदीचे दागिने, ताट-वाट्या लंपास

नाशिकमधील कॉलेजरोड भागातील डिसुझा कॉलनीतले घर फोडून चोरट्यांनी मोत्याचा हार आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

चोरट्यांचा दिवाळीबारः नाशिकमध्ये घरफोडी करून मोत्याचा हार, सोन्या-चांदीचे दागिने, ताट-वाट्या लंपास
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 4:23 PM

नाशिकः नाशिकमधील कॉलेजरोड भागातील डिसुझा कॉलनीतले घर फोडून चोरट्यांनी मोत्याचा हार आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुप्रतीक दत्ता यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुप्रतीक यांच्या तक्रारीनुसार 1 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान त्यांच्या तृप्ती अपार्टमेंटमधील अजिंक्य बंगल्यात ही चोरी झाली. चोरट्यांनी बंद बंगल्याचे पश्चिम बाजूच्या खिडकीच्या ग्रील उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी पन्नाचा खडा असलेला एक मोत्यांच्या मण्यांचा 20000 रुपयांचा हार, 15000 रुपये किमतीची गोल्ड प्लेटींग केलेली चांदीची चैन, गोल्ड प्लेटींग केलेल्या दोन चांदीच्या रिंग, एक 150 ग्रॅम वजनाचा चांदीचा बॉक्स, चांदीचे दोन नाणे, चांदीचा दिवा, पूजचे निरंजन, लोटी, ग्लास, लहान मोठे पूजेचे साहित्य, एक ब्राऊन रंगाची लेदर बॅग, चांदीचे ताट, चांदीच्या वाट्या, चांदीचे ग्लास असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत नाशिकमधील अशोक स्तंभ भागातील एका उघड्या घरातून महिलेची सोन्याची पोत लांबवल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रोहिणी किरण कर्पे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार चोरट्यांनी शनिवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास होरिणी कर्पे यांच्या अशोकस्तंभ परिसरातील घारपुरे घाटावारील शक्तीप्लाझा येथील उघड्या घरात घुसून 40 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली. याप्रकरणीही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सात घरफोड्या

येवला शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, त्यांनी तब्बल 7 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. येवला शहरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पटेल कॉलनी, आनंद नगर, मोरे वस्ती या कॉलनी भागात 7 ठिकाणी चोरी करत धुमाकूळ घातला आहे. यात 5 ठिकाणी बंद घरांच्या दरवाज्याचे कुलूप तोडत चोरी केली, तर परिसरातील राधाकृष्ण मंदिरातील दानपेटीतील रक्कम देखील चोरून नेली आहे. त्याचप्रमाणे आनंदनगर भागातील गणपती मंदिराची दानपेटी फोडत चोरट्यांनी त्यातील रक्कम देखील लंपास केली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर चोरीच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून, पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीय करीत आहेत. (In Nashik, thieves broke into a house and stole pearl necklaces, gold and silver jewelery)

इतर बातम्याः

राज्यभर पाखरमाया; महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून पक्षी सप्ताहाचे आयोजन

तब्बल 500 कोटींची बिले थकल्याने नाशिक पालिकेचा तोळामासा; अवघ्या 98 कर्मचाऱ्यांवर मदार

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.