शिरजोर चोरट्यांची दसऱ्यादिवशी सलामी; गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून नाशिकमध्ये 23 लाखांची धाडसी चोरी
गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून तब्बल 22 लाख 71 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सिन्नरमधल्या सरदवाडीत (जि. नाशिक) मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नाशिकः गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून तब्बल 22 लाख 71 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सिन्नरमधल्या सरदवाडीत (जि. नाशिक) मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या धाडसी चोरीबाबतची माहिती अशी की, सिन्नरमधल्या सरदवाडी येथे हॉटेल अजिंक्यताराजवळ अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी या एटीमची फोडी केली. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश केला. आपण कुणाच्याही जाळ्यात सापडू नये म्हणून सीसीटीव्हीचे केबल कनेक्शन तोडून टाकले. त्यानंतर सोबत असलेल्या गॅस कटर मशीनने एटीएमचे तुकडे केले. शटर बंद करून चोरट्यांनी डाव साधला. रोकड लंपास केल्यानंतरही शटर बंद ठेवले. दसऱ्यादिवशी दुपारपर्यंत एटीएमचे शटर बंदच होते. मात्र, शुक्रवारी दसरा सणानिमित्त पैसे काढायचे म्हणून अनेक ग्राहक तिथे येऊन गेले. एक ग्राहक बराच वेळ थांबला. त्याने शटर वर करून पाहिले. तेव्हा एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार, सोमनाथ तांबे, संतोष मुटुकुळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
…अन् काही पुरावे सोडले
चोरट्यांनी मोठ्या करामतीने शटर बंद करून एटीएम कापले. आपण सीसीटीव्हीत कैद होऊ नये म्हणून केबल कनेक्शन तोडले. मात्र, त्यांचे काही ठसे एटीएममध्ये उमटले होते. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना बोलावून या ठशांचे नमुने घेतले आहेत. सोबतच सीसीटीव्हीची हार्ड डिस्कचीत तपासणीही सुरू केली आहे.
सुरक्षारक्षक होता कुठे?
जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रत्येक एटीएमवर सुरक्षारक्षक शक्यतो तैनात केलेला असतो. ही घटना मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. मग या काळात एटीएमवरील सुरक्षारक्षक कुठे होता. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही एटीएमचे शटर बंद होते. मग सकाळीही सुरक्षारक्षक नव्हता की, येथे सुरक्षारक्षकच नेमलेला नव्हता, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. पोलीस तपासात हे सारे समोर येईलच.
इतर बातम्याः
हिंदू ही एकच जात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांचा लासलगावमध्ये दावा
VIDEO: मोदींकडून एजन्सींचा गैरवापर नाहीच, तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं; फडणवीसांचा हल्लाबोलhttps://t.co/ikBTKcJ5jU#devendrafadnavis | #bjp | #CMUddhavThackeray | #shivsena | #Dasara2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021