Jacqueline Fernandes | मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिसला भारत सोडण्यास बंदी, ईडीने जारी केली लुकआउट नोटीस

सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला सुमारे 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये 52 लाख किमतीचा घोडा आणि 9 लाख किमतीची पर्शियन मांजर देखील आहे. इतकंच नाही तर फतेहीवर त्याने खूप पैसाही खर्च केला होता.

Jacqueline Fernandes | मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिसला भारत सोडण्यास बंदी, ईडीने जारी केली लुकआउट नोटीस
जॅकलिन फर्नांडिसला भारत सोडण्यास बंदी
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 11:27 PM

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरु असल्याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला भारताबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जॅकलीन मुंबई विमानतळावरून फ्लाइट पकडणार होती पण तिला विमानतळावरच थांबवण्यात आले आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात या अभिनेत्रीची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला ईडीने आपल्या कार्यालयात बोलावून साक्षीदार म्हणून चौकशी केली होती. मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. सुकेशसोबतचा जॅकलिनचा एक वैयक्तिक फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास बराच काळ सुरू आहे. या प्रकरणाची सुरुवात सुकेश चंद्रशेखरपासून सुरू झाली आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीपर्यंत पोहोचली. काही दिवसांपूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात 7000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात असे अनेक खुलासे झाले होते, ज्यामुळे सर्वांच्याच होश उडाल्या आहेत. सुकेश चंद्रशेखर, त्यांची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुकेशने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

सुकेशकडून जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू

जॅकलिनला अनेक गिफ्ट्स देण्यात आल्या होत्या. त्या सर्व भेटवस्तू आणि त्यांची किंमत या अहवालात नमूद करण्यात आली आहे. सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला सुमारे 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये 52 लाख किमतीचा घोडा आणि 9 लाख किमतीची पर्शियन मांजर देखील आहे. इतकंच नाही तर फतेहीवर त्याने खूप पैसाही खर्च केला होता. नोराला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन देण्यात आला. ईडीने कोर्टात आरोपपत्र सादर करताना ही माहिती दिली. चंद्रशेखरवर तिहार तुरुंगात असताना एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे.

ईडीने लुकआउट नोटीस जारी केली

काही दिवसांपूर्वी सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनचे खासगी फोटोही मीडियामध्ये चांगलेच व्हायरल झाले होते. चंद्रशेखरचे बॉलिवूड कनेक्शन हळूहळू समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला चंद्रशेखर आणि जॅकलिनची ओळख झाली होती, त्यानंतर चंद्रशेखरने जॅकलीनला महागडे गिफ्ट देण्यास सुरुवात केली. सुकेशने जॅकलिनवर करोडो रुपये खर्च केले होते. याबाबत जॅकलिनकडे उत्तर मागितले जात आहे.

सूत्रांच्या हवाल्याने असेही वृत्त आहे की ED ने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात लुकआउट नोटीस जारी केली आहे, ज्यामध्ये ठग सुकेश चंद्रशेखरचा समावेश आहे. या प्रकरणात जॅकलिनच्या अडचणी वाढत आहेत. जॅकलिनवर ईडीची नजर आहे. त्यामुळे ती देशाबाहेर जाऊ शकत नाही. (Jacqueline Fernandes banned from leaving India, ED issues lookout notice)

इतर बातम्या

पुन्हा सैराट ! पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने भावने केली हत्या, बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं, महाराष्ट्र हादरला

Bengal Crime: बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.