पुण्यानंतर हा अपघातही चर्चेत, चार जणांच्या मृत्यूनंतर आरोपींना अटक का नाही? राजकीय दबावाचा आरोप

Accident news: पुण्याच्या आणि जळगावच्या घटनेचा विचार केला तर दोन्ही गोष्टींमध्ये साम्य आहे. मात्र आपण जळगावच्या अपघातानंतर सर्वात आधी ३०४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे एका आरोपीला लोकांकडून जास्त मार लागला.

पुण्यानंतर हा अपघातही चर्चेत, चार जणांच्या मृत्यूनंतर आरोपींना अटक का नाही? राजकीय दबावाचा आरोप
जळगाव अपघाताबाबत गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 12:20 PM

पुणे शहरातील एका अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्शे कारने दुचाकीवर असणाऱ्या दोन जणांना उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची चर्चा आता राज्यात नाही देशात होऊ लागली आहे. या प्रकरणात राजकीय दबावाचा आरोप झाला होता. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात ७ मे रोजी अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होतो. या प्रकरणात आरोपींना अजूनही अटक नाही. चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही या घटनेतील आरोपींना अटक होत असल्याने राजकीय दबाव असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या कुटुंबियांनी केला होता. त्यावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिला आहे.

दोन्ही घटनांमध्ये साम्य पण..

पुण्याच्या आणि जळगावच्या घटनेचा विचार केला तर दोन्ही गोष्टींमध्ये साम्य आहे. मात्र आपण जळगावच्या अपघातानंतर सर्वात आधी ३०४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे एका आरोपीला लोकांकडून जास्त मार लागला. त्यानंतर उपचाराची आवश्यकता असल्यामुळे मेडिकल फिटनेस नसल्यामुळे अटक करता येत नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, दोषींवर कारवाई करावी असे आदेश आपण पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत त्याचा अहवाल लवकर येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी मला दिला आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

अपघात झाला त्या दिवशी मृतांच्या नातेवाईकांचा संपर्कात होतो. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन झाले, त्या दिवशी जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. अपघाताबाबत जे सर्वोच्च कलम असते ते म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि माझा काही एक संबंध नाही. जे जे करता येत ते सर्व करण्याचा आपण प्रयत्न केला, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपींना यामुळे अटक नाही…

आरोपी माझे नातेवाईक नाही. मात्र ज्या चार जणांचा मृत्यू झाला ते माझ्या मतदारसंघातले आहेत. त्यामुळे या प्रकरणात शेवटपर्यंत मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न करत राहणार आहे. वैद्यकीय कारणामुळे आरोपींना अटक करता येत नव्हती. मात्र तरीसुद्धा आरोपींना तातडीने अटक करण्याबाबत आदेश मी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.