लाखोंची डील करुन पैसे बळकावले, दोन वर्ष पोलिसांना चकवा, अखेर दिल्लीत दाम्पत्याला बेड्या

जम्मू-काश्मीरमध्ये एका उद्योगपतीला लाखोंचा गंडा घालून फरार झालेल्या आरोपी दाम्पत्याला पकडण्यात जम्मूच्या क्राईम ब्रांचला यश आलं आहे (Jammu Kashmir Police arrested couple from Delhi in Cheating case).

लाखोंची डील करुन पैसे बळकावले, दोन वर्ष पोलिसांना चकवा, अखेर दिल्लीत दाम्पत्याला बेड्या
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 6:54 PM

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये एका उद्योगपतीला लाखोंचा गंडा घालून फरार झालेल्या आरोपी दाम्पत्याला पकडण्यात जम्मूच्या क्राईम ब्रांचला यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलीस गेल्या दोन वर्षांपासून या आरोपींच्या पाठीमागे होते. आरोपी हातात येणार तेवढ्यात ते तिथून पळ काढायचे. या आरोपींना पकडण्यात पोलिसांची मोठी दमछाक झाली. मात्र, अखेर दिल्लीच्या टिळक नगर परिसरात त्यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. या आरोपींचं नाव हरमोहिंदर सिंह आणि गुरप्रती कौर असं आहे. दोघं पती-पत्नी आहेत.

नेमकं प्रकरण काय?

हरमोहिंदर सिंह आणि त्याची पत्नी गुरप्रती कौर यांचं जम्मूत SERA CUE Lab लिमिटेड नावाचा लॅब आहे. या लॅबचा हरमोहिंदर सिंह हा CEO तर त्याची पत्नी गुंतवणूकदार आहे. या दोघांवर एका व्यक्तीला लाखो रुपयांनी लुबाडल्याचा आरोप आहे. या दाम्पत्याने जम्मूच्या बख्शीनगर येथील रहिवासी नमन सिंह यांच्यासोबत करार करुन लाखो रुपये लुबाडल्याची तक्रार आहे.

नमन सिंहला 50 लाखांनी लुबाडलं

नमन सिंह यांनी आरोपींसोबत करार केला होता. त्या करारानुसार आरोपी दरमहिन्याला त्यांच्या लॅबच्या उतपन्नाचा काही टक्का रक्कम देणार होते. त्यानुसार दाम्पत्याने नमन सिंह यांना दर महिन्याला जवळपास एक लाख रुपये देण्याचं निश्चित केलं होतं. त्या मोबदल्यात त्यांनी नमन सिंह यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले. मात्र, आरोपींनी 50 लाख रुपये घेतल्यानंतर त्यांची नियत फिरली. त्यांनी आपल्या कंपनीचा हिस्सा नमन सिंह यांना दिला तर नाहीच, वरुन 50 लाख रुपये घेऊन ते पळून गेले.

नमन सिंहची पोलिसात धाव

याप्रकरणी आपण लुबाडलो गेलो, याची जाणीव झाल्यानंतर नमन सिंह यांनी जम्मू काश्मीर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पैसे जास्त असल्याने जम्मू पोलिसांनी याचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवला. त्यानंतर क्राईम ब्रांच कामाला लागली.

आरोपींचा दोन वर्ष पोलिसांना चकवा

जम्मू क्राईम ब्रांच तातडीने कामाला लागली. क्राईम ब्रांच दाम्पत्याचे पाठीमागे हात धुवून लागली. क्राईम ब्रांचचे पोलीस दाम्पत्याच्या पाठोपाठ पंजाब, हरियाणा, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरले. मात्र, आरोपी इतके चपळ होते की त्यांना थोडाजरी सुगावा लागला तर ते तिथून धूम ठोकायचे. मात्र, अखेर दिल्लीच्या टिळक नगरमध्ये दामपत्याला पकडण्यात क्राईम ब्रांचला यश आलं.

हेही वाचा : Sachin Vaze Case : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर पुस्तक लिहिण्यासाठी सगळा कट? 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.