दरीत फेकल्यानंतर दोन तास झाडावर अडकले, माळशेज घाटातील थरार, वृद्ध अधिकारी कसाबसा बाहेर

कोट्यवधी रुपयांसाठी एका सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याचं अपहरण करुन त्याला माळशेज घाटात फेकून देण्यात आलं.

दरीत फेकल्यानंतर दोन तास झाडावर अडकले, माळशेज घाटातील थरार, वृद्ध अधिकारी कसाबसा बाहेर
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 5:53 PM

कल्याण : कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Retired Railway Officer Thrown Into Malshej Ghat). कोट्यवधी रुपयांसाठी एका सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याचं अपहरण करुन त्याला माळशेज घाटात फेकून देण्यात आलं. घाटात एका झाडावर अडकल्याने प्रकाश भोईर नावाच्या या रेल्वे अधिकाऱ्याला जीव वाचला आहे (Retired Railway Officer Thrown Into Malshej Ghat).

12 तास प्रकाश भोईर हे बेशुद्ध होते. शुद्धीवर आल्यानंतर जखमी अवस्थेत भोईर तीन तासांनी दरीतून रस्त्यावर आले आणि सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे रेल्वे अधिकाऱ्याच्या काळजीवाहू तरुणाने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणारे प्रकाश भोईर हे सेवा निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. त्यांना जखमी अवस्थेत काही नागरीकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. माळशेज घाटात त्यांचं अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आली आणि दरीत फेकून देण्यात आले होते. 12 तासानंतर ते शुद्धीवर आले आणि 3 तासानंतर दरीतून रस्त्यावर आल्यानंतर प्रकाश भोईर हे कल्याणला पोहोचले. उपचारादरम्यान प्रकाश भोईर यांनी जो खुलासा केला ते ऐकून पोलिसाना धक्का बसला.

प्रकाश भोईर हे वयोवृद्ध असल्याने त्यांचे बँकेचे कामकाज त्यांच्या जवळील असलेला शैलेंद्र गायकवाड हा पाहतो. भोईर यांच्याकडे किती दागिने, किती पैसे आहेत, याची सर्व माहिती त्याला आहे. बँकेतील पासवर्ड मेल आयडी सर्व काही शैलेंद्रकडे आहे. भोईर गेले, तर हे सर्व आपल्याला मिळू शकते. या लालसेपोटी शैलेंद्रने त्याच्या एका नातेवाईक भरत गायकवाड याच्यासह एक कट रचला (Retired Railway Officer Thrown Into Malshej Ghat).

या दोघांनी 25 जानेवरीला प्रकाश भोईर यांचे अपहरण करुन त्यांना माळशेज घाटात नेले. तिथे त्यांना मारहाण करुन त्यांच्या डोक्यावर प्रहार करुन त्यांना माळशेज घाटात फेकून दिले. ते मृत झाले असल्याचे समजून त्यांनी पळ तेथून काढला. मात्र, ‘देव तारी त्याला कोण मारी’, ही म्हण भोईर यांच्याबाबतीत खरी ठरली. ते या घटनेतून बचावले.

त्यांनी पोलिसांनी दिलेल्या जबाबानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण बनकर आणि पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांचा मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. आठ तासाच्या आत पोलिसांनी शैलेंद्र आणि भरत या दोघांना पुण्याहून शोधून काढले. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 23 तोळे दागिने हस्तगत करायचे आहे. मात्र, मालमत्तेच्या लालसेपोटी एखादा व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो. याचा प्रत्यय या घटनेतून समोर आला आहे.

Retired Railway Officer Thrown Into Malshej Ghat

संबंधित बातम्या :

मॉडेलिंगचे अमिष दाखवून 14 वर्षीय मुलगी वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप, इव्हेंट मॅनेजरसह 2 कास्टिंग डायरेक्टरला अटक

छेडछाडीतून तरुणाचा खून, पाच वर्षांनंतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.