बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आधी बस रोखली, मुलगा-मुलीला खाली उतरवलं, नंतर प्रचंड मारलं, कारण नेमकं काय?

कर्नाटकाच्या मंगळुरु येथे विचित्र प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत फिरायला गेला म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे (Karnataka Mangaluru Youth beaten for traveling with girl of another religion).

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आधी बस रोखली, मुलगा-मुलीला खाली उतरवलं, नंतर प्रचंड मारलं, कारण नेमकं काय?
दोन वेगवेगळ्या धर्माच्या मित्र-मैत्रिणीचा बसमध्ये प्रवास, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून बस रोखत तरुणाला मारहाण
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 3:25 PM

बंगळुरु : कर्नाटकाच्या मंगळुरु येथे विचित्र प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत फिरायला गेला म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींनी गुरुवारी (1 एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता बस रोखली. बसमध्ये प्रवास करणारा संबंधित मुलगा आणि मुलीला बसखाली उतरवलं. त्यानंतर तरुणाला प्रचंड मारहाण केली. मुलगा-मुलगी हे दोघं एकाच वर्गात शिकले. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण त्यांचा धर्म वेगळा आहे. त्यावरुन आरोपी नराधमांनी तरुणाला प्रचंड मारहाण केली. यावेळी तरुणीने तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिलाही दुखापत झाल्याचं समोर आलं आहे (Karnataka Mangaluru Youth beaten for traveling with girl of another religion).

आरोपींमध्ये चार बजरंग दलाचे कार्यकर्ते

याप्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात बजरंग दलाचे चार कार्यकर्तेही सामील आहेत. हे चारही जण कारने आले. त्यांनी बस रोखली. मुलाला बसमधून खाली उतरवत त्याला प्रचंड मारहाण केली. यावेळी त्यांनी चाकूनेदेखील हल्ला केला. त्यामुळे पीडित मुलगा जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

पोलिसांचा तपास सुरु

तरुणी ही बंगळुरुला जात होती. तिच्यासोबत फिरणाऱ्या तरुणाला बंगळुरुविषयी चांगली माहिती होती. याशिवाय मुलगी कित्येक वर्षांपासून त्याला ओळखते. तो मुलीला मदतच करत होता, असं तिचं म्हणणं आहे. मात्र, हे दोघंही जण एका बसने प्रवास करत होते हे त्या नराधमांना कसं कळलं, त्यांनी त्या तरुणाला नेमकं का मारहाण केली. त्यामागे आणखी काही वेगळं कारण आहे का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

विशेष म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय दक्षिण कन्नड जिल्ह्यातही सांप्रदायिक घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या घटनांच्या पाठिमागे नेमकं कोण आहे याचाही तपास आता पोलीस करत आहे. यासाठी पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आलं आहे (Karnataka Mangaluru Youth beaten for traveling with girl of another religion).

हेही वाचा : सोलापुरात अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच रक्त सांडलं, लग्नाच्या दोन महिन्यातच पत्नीला संपवलं!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.