लहान मुलांचं रक्त प्यायचा हा ‘ड्रॅक्युला’, पोलिसांना चकवून पळाला, जमावाने ठेचून मारला

मास्टेन वंजाला (Masten Wanjala) नावाचा सिरीअल किलर काही दिवसांपूर्वी पोलीस कोठडीतून पळून गेला होता, त्यानंतर केनियामधील पोलिस त्याचा शोध घेत होते. पण पोलिसांच्या आधी जमावानेच त्याला शोधून काढले आणि बेदम मारहाण करुन ठार मारले

लहान मुलांचं रक्त प्यायचा हा 'ड्रॅक्युला', पोलिसांना चकवून पळाला, जमावाने ठेचून मारला
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 12:28 PM

मुंबई : केनियातील एका सिरीअल किलरची हादरवून टाकणारी कहाणी समोर आली आहे. या सीरियल किलरच्या निशाण्यावर लहान मुले होती. मुलांची हत्या केल्यानंतर, सीरियल किलर त्यांचे रक्त पित असे, म्हणून स्थानिक त्याला ‘नरपिशाच्च’ म्हणत असत. पोलिसांच्या कोठडीतून पळून गेल्यानंतर जमावाने त्याला पकडले आणि बेदम मारहाण करुन त्याचा जीवच घेतला. या सीरियल किलरने कबूल केले होते की आतापर्यंत त्याने 10 मुलांना जीवे ठार मारले आहे. हत्येनंतर तो लहान मुलांचे रक्त प्यायचा.

लहान मुलांचे रक्त पिणारा सिरीअल किलर

मास्टेन वंजाला (Masten Wanjala) नावाचा सिरीअल किलर काही दिवसांपूर्वी पोलीस कोठडीतून पळून गेला होता, त्यानंतर केनियामधील पोलिस त्याचा शोध घेत होते. पण पोलिसांच्या आधी जमावानेच त्याला शोधून काढले आणि बेदम मारहाण करुन ठार मारले. जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली होती, तेव्हा आरोपीने कबूल केले की तो मुलांना अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा.

हे प्रकरण केनियातील नैरोबीचे आहे. अलिकडेच येथील रहिवासी असलेल्या मास्टेन वंजाला याला अटक करण्यात आली होती. जुलै महिन्यात दोन मुले बेपत्ता झाल्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला. पोलीस त्याला कोर्टात घेऊन जात होते, पण त्याआधीच तो पळून गेला.

कोण होतं टार्गेट

पोलीस तपासात उघड झाले की वंजाला बहुतांश वेळा 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना टार्गेट करत असते. त्यांना तो अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा किंवा कधीकधी तो थेट चाकूने मारायचा. यानंतर, काही मुलांचे रक्त प्यायल्याचेही त्याने स्वीकारले. तो मुलांना फुटबॉल प्रशिक्षक असल्याचा बहाणा करुन सोबत घेऊन जायचा.

संबंधित बातम्या :

VIDEO | मुलं आहेत, थोडं जास्त प्यायले, तर काय झालं? मद्यधुंद कारचालकाला दंड, महिला आमदाराचा पोलिस स्टेशनला ठिय्या

VIDEO | बायकोशी भांडणातून स्वतःचं घर पेटवलं, आजूबाजूची दहा घरं जळून खाक, ग्रामस्थांनी धू-धू धुतलं

धारदार शस्त्राने सपासप वार, कोल्हापुरात निर्घृण हत्याकांड, अल्पवयीन मुलांसह सहा जण जेरबंद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.