Wife Swapping Racket | केरळमध्ये बायकोंची अदलाबदल करणारं मोठं रॅकेट, परपुरुषांशी लैंगिक संबंधांसाठी हजारोंचा पत्नीवर दबाव
एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली होती. आपला पती आपल्याला इतर पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याचा आरोप तिने केला होता. यापूर्वी कायमकुलम येथूनही अशीच एक घटना समोर आली होती.
तिरुअनंतपुरम : काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ चित्रपटातील कथानक केरळमध्ये प्रत्यक्षात घडल्याचं दिसत आहे. पत्नींची अदलाबदल करणाऱ्या (Wife Swapping) मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि मेसेंजरवर ( Messenger) ग्रुप तयार करुन एक हजार जणांना सहभागी करण्यात आलं होतं. पती-पत्नी एक्स्चेंज रॅकेटमध्ये (Kerala Husband Wife Exchange Racket) सहभागी झालेल्या सात जणांना पोलिसांनी कोट्टायम (Kottayam) येथून अटक केली आहे. तर 25 हून अधिक जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली होती. आपला पती आपल्याला इतर पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याचा आरोप तिने केला होता. यापूर्वी कायमकुलम येथूनही अशीच एक घटना समोर आली होती.
तक्रारदार महिलेच्या पतीला अटक
या प्रकरणी चांगनचेरीचे डेप्युटी एसपी आर श्रीकुमार म्हणाले की “आधी ते टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे आणि नंतर एकमेकांना भेटायचे. आम्ही तक्रारदार महिलेच्या पतीला अटक केली आहे. यामागे एक मोठे रॅकेट आहे आणि आम्ही तपास करत आहोत. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.”
1000 हून अधिक सदस्य असल्याचा संशय
अटक करण्यात आलेले आरोपी केरळमधील अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम येथील रहिवासी आहेत. राज्यातील अनेक उच्चभ्रू वर्गातील लोक या रॅकेटचा भाग असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर 25 हून अधिक जण पोलिसांच्या निगराणीत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता आहे. या रॅकेटचे व्हॉट्सअॅप ग्रुप आणि मेसेंजर ग्रुपमध्ये 1000 हून अधिक सदस्य असल्याचा संशय आहे.
काय आहे प्रकरण?
रिपोर्टनुसार, कोट्टायम येथील एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली की, तिचा पती तिला दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि मित्रांना अटक केली. या अटकेनंतर पोलिसांना ‘एक्सचेंज रॅकेट’ची माहिती मिळाली.
Kerala | Seven people have been arrested from Karukachal for their alleged involvement in a case relating to partner swapping, police said. (10.01) pic.twitter.com/e9OIAPaNoz
— ANI (@ANI) January 10, 2022
केरळातील पती पत्नी एक्सचेंज रॅकेटमध्ये हजाराहून अधिक जण सहभागी आहेत, ज्यामध्ये शारीरिक संबंधांसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण केली जात असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट टेलिग्राम आणि इतर ऑनलाइन मेसेंजर अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून चालते. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :
गर्लफ्रेण्डचीही ‘गर्लफ्रेण्ड’ निघाली, बॉयफ्रेण्ड चवताळला, समलिंगी संबंधातून 29 वर्षीय तरुणीची हत्या
स्नॅपचॅटवर अनोळखी तरुणाशी मुलीचे प्रेमप्रकरण; तिने न्यूड फोटो पाठविल्यावर सुरू झाला खेळ!
माझी बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या, नवरा थेट पोलिसात; बायकोने सांगितलं चक्रावणारं कारण