‘केरला स्टोरी’ची इचलकरंजीत पुनरावृत्ती?, सोशल मीडियातून ओळख वाढवली; प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन्…

कोल्हापूरच्या इचलकरंजीत धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची जबरदस्ती करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

'केरला स्टोरी'ची इचलकरंजीत पुनरावृत्ती?, सोशल मीडियातून ओळख वाढवली; प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन्...
shivaji nagar police stationImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 9:37 AM

कोल्हापूर : इचलकरंजीमध्ये द केरला स्टोरी या सिनेमाची पुनरावृत्ती झाली आहे. केरला स्टोरी सिनेमात जसं घडलं तसंच इचलकरंजीत घडल्याने खळबळ उडाली आहे. इचलकरंजी येथील चंदूर परिसरात राहणाऱ्या एका मुस्लीम तरुणाने सोशल मीडियावर ओळख करत एका हिंदू अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे हिजाब घालून फोटो काढले आणि पीडित मुलीस मुस्लीम धर्माप्रमाणे वागण्यास सांगत ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच साद मुजावर ( वय 21, रा. आभार फाटा, चंदूर ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

साद मुजावर हा शहरातील हा चिकनच्या दुकानात कामाला आहे. सहा महिन्यापूर्वी त्याची एका हिंदू अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर त्याने या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांचे भेटणेही सुरू झाले. दोघे शहरातील कॉफी शॉपमध्ये नेहमी भेटायचे. यावेळी त्याने तिच्याशी मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या मुलीला त्याने हिजाब घालून फोटा काढण्यास सांगितलं. तिच्यासोबत फोटो काढले आणि तिला मुस्लीम रिवाजाप्रमाणे वागण्यास सांगितलं. तसे न केल्यास फोटो व्हायरल करण्याची त्याने धमकीही दिली. तसेच तिचा विनयभंग केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तरुणाची कसून चौकशी

या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन साद मुजावर याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य ओळखून साद विरोधात गुन्हा दाखल केला. अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, विनयभंग आदी विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक समिरसिंह साळवे यांनी दिली आहे. या प्रकरणी सदर तरुणाची कसून चौकशी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

घराबाहेर पोलीस संरक्षण

याबाबतची माहिती मिळताच शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्आय ओळखून पोलिसांनी चंदूर (आभार फाटा) परिसरातील साद मुजावर याच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणाचा पोलीस उपाधीक्षक समिरसिंह साळवे अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....