Aurangabad crime: गुन्हेगारीविरोधात सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन! शहरातील 17 ठाण्यांच्या हद्दीत 30 तास शोधाशोध, अवैध दारू, तलवारी, मुद्देमाल जप्त

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी दुपासी चार ते 3 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.

Aurangabad crime: गुन्हेगारीविरोधात सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन! शहरातील 17 ठाण्यांच्या हद्दीत 30 तास शोधाशोध, अवैध दारू, तलवारी, मुद्देमाल जप्त
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 11:48 AM

औरंगाबाद: शहरातील 17 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संशयित आणि अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या (Aurangabad Police Commissioner) वतीने 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी 30 तास कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत दारू विक्रेते, जुगारी शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात आले. आतापर्यंतचे शहरातील हे सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन ठरले. गुन्हेगारांवर (Aurangabad criminals) पोलिसांचा वचक ठेवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या ऑपरेशनला चांगलेच यश मिळाल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली.

का राबवले कोम्बिंग ऑपरेशन?

गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन चोरी, घरफोडी, खून, मंगळसूत्र, मोबाइल, रोख रक्कम हिसकावणे, नागरिकांची लूटमार यासारखे गंभीर गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे विविध वसाहतींमधील नागरिक त्रस्त आहेत. ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी दुपासी चार ते 3 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यात संशयित इमान अमजद खान, तेजेंद्र सिंग नथासिंग ग्रंथी, शेख अमन शेख सलीम, शाम किसन साबळे, सय्यद मुजाहेद सय्यद युसूफ, सचिन गणेश बोडखे, राहुल साळवे, विठ्टठ ऊर्फ भावड्या नजन, ज्ञानेश्वर शेळके तसेच हद्दपार गुन्हेगार मंगेश भालेराव यांना पकडण्यात आले.

साताऱ्यात गुटख्याच्या साठ्यावर छापा

सातारा परिसरातील योगेश शिंदे याच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी रविवारी दुपारी शिंदे यांच्या घरावर छापा मारला. तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना घरात जाण्यास विरोध केला. मात्र झाडाझडती घेतली तेव्हा तेथे विविध कंपन्यांचा पावणेतीन हजारांचा गुटखा सापडला.

तीन गुन्हेगारांकडून तलवारी जप्त

गणेश संजय डाखोळे, गणेश सुधाकर कवडे, शेख मोहसीन शेख खैरू या तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी तलवारी जप्त केल्या आहेत.

एक लाखांचा देशी दारूचा साठा जप्त

पोलिसांनी दोन दिवस चालवलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये देशी दारूच्या साठ्यांवरही छापा टाकण्यात आला. शहरातून अनेक वाहानांसह देशी दारूचा एक लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

ऑपरेशन सुरु असतानाच दोन चोऱ्या

दरम्यान पोलिसांचे हे ऑपरेशन सुरु असतानाच मुकुंदवाडी, छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरे चोरट्यांनी फोडली. मुकुंदवाडीत राहणाऱ्या चंदाबाई राठोड या 40 वर्षीय महिलेच्या घरी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली. त्यांच्या कानातील सोन्याचे टॉप्स, रिंग, डोरले, मनी पेंडल, रिंग असा ऐवज चोरून नेला. तर छावणी ठाण्याच्या हद्दीत दुसरी घटना घडली. यात दुकानाचे शटर उचकटून चोराने किराणा साहित्यासह सिगारेट, रोख आणि मोबाइल लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री नंदनवन कॉलनीतील वसुंधरा कॉलनीत घडली. उल्कानगरीत एक चारचाकी शुक्रवारी मध्यरात्री चोरीला गेली तर तुकोबा नगरात सहाय्यक कार्यकारी अभियंता दीपक महिपतराव हिवाळे यांची दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

इतर बातम्या- 

मोठी बातमी:  नमामि गंगे योजनेत औरंगाबादच्या खाम नदीचा समावेश, देशात नदीकाठची 30 तर महाराष्ट्रातील दोन शहरे

Railway: लवकरच पॅसेंजरही सुरु होणार,औरंगाबाद मार्गावरील रेल्वे व जनरल डब्यांची सुविधा ऑक्टोबर महिन्यात टप्प्या-टप्प्याने

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.